‘सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोकमधून या प्रकरणावर टिप्पणी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं. महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांचा कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी मुंबई पोलिस हे जगातील उत्तम पोलिस आहे. बिहारमधल्या राजकारणासाठीच हा सगळा खटाटोप आहे.’ असा स्पष्ट उल्लेख त्यांनी यावेळी केला.
‘कारण नसताना दिल्ली आणि बिहारचे लोक संशयाचे धुकं निर्माण करताहेत, पण सर्वानाच माहितीये सत्य काय आहे ते. जे काही सुरू आहे त्यात अजिबात तथ्य नाहीये. हिटलरकडे एक गोबेल्स आहेत आणि आपल्या राज्यात दहा राज्यात गोबेल्स आहेत,’ असंही संजय राऊत यांनी सुनावलं आहे.
सीबीआयने हातात घेतलेली खुनाची कोणती प्रकरणं सुटली? याचं उत्तर कुणी देऊ शकेल का? बिहारमध्ये गेल्या वर्षभरात सात ते आठ हत्या झाल्या होत्या ही प्रकरणं सीबीआयकडे गेली होती. यातले आरोपी पकडले गेले आहेत का? या सगळ्याचं उत्तर नाही असंच आहे. राजकारण करायचं म्हणून सीबीआयकडे प्रकरण द्यायचं का? मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाच्या पुढे सीबीआय एक पाऊल जरी पुढे गेलं तरी मी सीबीआयचा पुतळा उभा करेन, सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस तपास करत आहेत, त्यात सीबीआयचा संबंध काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.
‘सुशांतच्या कुटुंबियाविषयी रोखठोक या सदरात मांडलेल्या मतांवरही संजय राऊत यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. ‘सर्वांनी संयम पाळायला हवा होता. त्यांनी सरळ महाराष्ट्र सरकार, पोलिसांवर व तरुण मंत्र्यांवर आरोप करताहेत तेव्हा त्यांनी संयम बाळगला का, मी ३५ वर्षांनंतर बोलायला लागलोय. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली का? हा काही वादाचा मुद्दा आहे का? या प्रश्नाचं उत्तर तपास झाल्यावर पुढे येईलचं त्या वेळेस मी बोलेनं,’ असंही ते म्हणाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times