मेरठ : देशात गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे पतीच्या मृत्यूवरून पत्नीने असं काही केलं पोलिसांनी थेट स्मशानभूमी गाठून अंत्यविधी थांबवला. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.अधिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये पतीच्या मृत्यूवरून पत्नीने मोठा गोंधळ घातला. सासरच्या मंडळींनी पतीची हत्या केली आणि त्याचा अंत्यविधी करत असल्याचा आरोप तिने पोलिसांत केला. महिलेने केलल्या तक्रारीनंतर पोलिसांनी लगेच स्मशानभूमी गाठत चिता जाळणे थांबवले आणि चक्क मृतदेह उचलून तो ताब्यात घेतला. यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आता पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे.

कॅबिनेट मंत्री करण्याची ऑफर देणारा फोनही मलाही आला, भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचा दावा
विवेक नावाचा व्यक्ती मेरठमध्ये एका स्पोर्ट्स फॅक्टरीत काम करायचा. त्याची पत्नी भावना दोघांच्या भांडणामुळे माहेरी राहत होती. रविवारी अचानक भावनाला तिच्या पतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आणि त्याचे नातेवाईक त्याच्यावर अंत्यसंस्कार करत असल्याचं तिच्या समजलं.

यानंतर भावना सासरी गेल्या आणि त्यांनी खूप गोंधळ घातला. महिलेने कुटुंबियांवर पतीच्या हत्येचा आरोप केला आणि पोलिसांत तक्रार केली. यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत आत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Weather Alert: राज्यावर पुढचे ३ दिवस अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्याला हवामान खात्याचा अलर्ट जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here