धाराशीव : १४ वर्षीय मुलीला १५ दिवसांपासून सतत उलट्या होत होत्या. म्हणून कळंब येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुलीच्या तपासणी अहवालात दीड महिन्याची गर्भवती समजल्यानंतर ऊसतोड आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील इयत्ता ७ वीमध्ये शिकणारी १४ वर्षीय मुलगी दुपारी आजीचा डबा घेवून शेताकडे जात असताना पाठी मागून येऊन १६ वर्षीय मुलाने जबरदस्तीने ज्वारीच्या शेतात नेत अत्याचार केला. नंतर एके दिवशी दुसऱ्या २० वर्षीय मुलाने सदर मुलगी घरी एकटी असताना घरात येऊन अत्याचार केला. नंतर तिसऱ्या २४ वर्षीय मुलाने घरी काम आहे असे सांगून घरी बोलावले व अत्याचार केला. चौथ्या २१ वर्षीय मुलाने पीडित मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेऊन जबरदस्तीने अत्याचार केला. पाचव्या २२ वर्षीय मुलाने सदर पीडित मुलगी घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन अत्याचार केला.

Weather Alert: राज्यावर पुढचे ३ दिवस अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्याला हवामान खात्याचा अलर्ट जारी
विशेष म्हणजे ५ ही मुलांनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी सदर पीडित मुलीवर अत्याचार केला आहे. ५ ही आरोपी हे पीडित मुलीच्या गावातील आहेत. सदर मुलीचा ६ महिन्यापासून ५ आरोपीने पाठलाग केला व अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपीने पीडित मुलीला तुला व तुझ्या आई, वडील, भावास ठार मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिराढोण पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता कलम- 376, (2)(I), 376, (2) (n), 376 ( 2) (j), 506, सह पोक्सो कलम 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ४ आरोपींना अटक केली असून १ आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पिंक पथकचे पीएसआय गंगाधर पुजरवाड हे करत आहेत.
पत्नीने केली तक्रार, पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवला; चितेवरून पतीची बॉडी उचलली अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here