मुंबई: विरोधी पक्षनेते यांची भाजपचे बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर अद्याप शिक्कामोर्तब होणं बाकी असतानाच सत्ताधाऱ्यांनी टोलेबाजी सुरू केली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री , सामाजिक न्यायमंत्री यांनी फडणवीसांच्या या संभाव्य नियुक्तीवर खोचक व सूचक टिप्पणी केली आहे. (, taunts )

वाचा:

‘महाराष्ट्रात सत्तेत येण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळंच देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती बिहारमध्ये केली जात आहे. त्यांनी तिकडंच राहावे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत,’ असा टोला वडेट्टीवार यांनी हाणला. सुशांत प्रकरणात भाजपकडून मुंबई पोलिसांवर झालेल्या आरोपांचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. ‘ज्यांच्या सुरक्षेत फडणवीसांनी पाच वर्षे महाराष्ट्राची सत्ता भोगली. त्याच्यावर अविश्वास म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा जसा भाजपनं लावून धरला तसा शेतकरी आत्महत्येविषयी कधी आवाज उठवला नाही. बिहारमध्ये गुंडाराज असताना फडणवीस आणि भाजप त्यांचीच भाषा बोलत होते,’ असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

वाचा:

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी फडणीवसांच्या बिहारमधील संभाव्य नियुक्तीबाबत सूचक विधान केले. ‘यालाच योगायोग म्हणतात,’ असं मुंडे म्हणाले.

संजय राऊतांचा वेगळा सूर

काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांवर टीका करत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र वेगळाच सूर लावला आहे. ‘देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत. विरोधी पक्षनेते आहेत. सर्वसाधारणपणे ज्यांना निवडणुकीचा अनुभव जास्त असतो, त्यांना प्रभारी केलं जातं. फडणवीसांच्या बाबत त्यांच्या पक्षालाही तसं वाटलं असेल. महाराष्ट्राच्या नेत्याला अशी जबाबदारी मिळत असेल तर आपण त्याकडं सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे,’ असं संजय राऊत म्हणाले.

वाचा:

भाजप नेतृत्वाला आहे ‘हा’ विश्वास

बिहारमध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. बिहारमध्ये सध्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल व भाजपच्या आघाडीचं सरकार आहे. बिहारमध्ये नितीश कुमार मोठ्या भावाच्या भूमिकेत असले तरी तिथे आपलं स्थान आणखी मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. फडणवीस ते काम करू शकतात, असा विश्वास भाजप नेतृत्वाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here