मुंबईः राज्यातील करोना रुग्णसंख्येला उतार येत नसतानाच रुग्णांच्या मृत्यूचा दररोजचा आकडा वाढू लागला आहे. आज दिवसभरात १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर तब्बल ३६४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील करोना मृतांचा वाढणारा आकडा चिंताजनक आहे. ()

राज्यात एकीकडे रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असताना मृत्यूदर मात्र स्थिर आहे त्यामुळं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. आज तब्बल ३६४ करोनाबाधित रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून राज्यातील एकूण करोना मृतांची संख्या १९ हजार ४२७ इतकी झाली आहे. राज्यातील हा करोनामृतांचा आकडा काळजी वाढवणारा आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३. ३९ % इतका आहे.

वाचाः

राज्यात आज १२ हजार ६०८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण करोनाबाधित रुग्णांचा आकडा ५ लाख ७२ हजार ७३४ इतका झाला आहे. तर, गेल्या २४ तासांत १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यात आत्तापर्यंत ४ लाख ०१ हजार ४४२ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.०९ % इतकं झालं आहे.

वाचा:

राज्यात एकूण १ लाख ५१ हजार ५५५ अॅक्टिव्ह रुग्ण असून विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ०८५ चाचण्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ (१८.८ टक्के) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात १० लाख ३२ हजार १०५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून ३७ हजार ३८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here