क्रांतीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने कोणाचेही नाव न घेता नवऱ्याला साथ देत त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या कारवाईवर भाष्य केलं आहे. कोणताही आक्रस्ताळेपणा न करता शांतपणे क्रांतीने आपलं मत व्हिडिओच्या माध्यमातून मांडलं आहे. यात ती म्हणाली की, ‘मुर्ख बनवण्याच्या दोन पद्धती आहेत, एक जे खरं नाही त्यावर विश्वास ठेवणं आणि दुसरं म्हणजे जे खरं आहे त्यावर विश्वास ठेवण्यास नकार देणं. पुन्हा एकदा ऐका आणि समजून घ्या.’
नवऱ्यासाठी ठामपणे उभं राहण्याची क्रांतीची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अनेकदा समीर यांच्यासाठी आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘त्यांच्याविरोधातील सर्व आरोप खोटे आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करतोय,’ असंही ती म्हणाली होती. समीर यांनीही सीबीआय चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. ‘सत्यमेव जयते, न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि आवश्यक ते सर्व सहकार्य मी करेन. वंदे मातरम,’ असेही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं.