आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच विधान केले आणि देशातील सर्वात मोठी नोट चलनातून वगळण्याच्या निर्णयामागील कारणांची सविस्तर माहिती दिली. याशिवाय आरबीआय भविष्यात १००० रुपयांची नोट आणणार आहे का? याचे उत्तर आरबीआय गव्हर्नर यांनी दिले. शक्तिकांत दास यांनी सांगितले की, सध्या अशी कोणतीही योजना नाही.
क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत नोटबंदी
आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, क्लीन नोट पॉलिसी णंतर्गत दोन हजार रुपयाची नोट चलनातून बाद करण्यात आली आहे. नोट एक्सचेंज डेटा तयार करणे आवश्यक आहे. तुम्ही ३० सप्टेंबरपर्यंत २,००० रुपयांच्या नोटांनी खरेदी करू शकता. नियमानुसार दोन हजार रुपयाच्या नोटा हव्या तेवढ्या बदलता येतात. बँकांनी नोटा बदलण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.
आरबीआय गव्हर्नरांच्या विधानांचे महत्त्वाचे मुद्दे
- नोटा बदलण्याची घाई करू नका
- ३० सप्टेंबरनंतरही २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर
- दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी चार महिन्यांची मुदत
- क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत २,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला.
- इतर मूल्यांच्या पुरेशा नोटा बाजारात आहेत
- २००० रुपयांची नोट कायदेशीर निविदा राहील
२००० रुपयाच्या नोटांचे सर्क्युलेशन पूर्ण
दास म्हणाले, दोन हजार रुपयांच्या नोटांचे चलनही ६ लाख ७३ हजार कोटी रुपयांवरून ३ लाख ६२ हजार कोटी रुपयांवर आले आहे, जसे आम्ही सांगितले आहे. छपाईही बंद करण्यात आली असून नोटांनी त्यांचे चक्र पूर्ण केले आहे. शक्तिकांता दास म्हणाले, “मी स्पष्ट करतो आणि पुन्हा जोर देतो की हा रिझर्व्ह बँकेच्या चलन व्यवस्थापन कार्याचा एक भाग आहे. अनेक दिवसांपासून रिझर्व्ह बँक क्लीन नोट पॉलिसी अवलंबत आहे. आरबीआय वेळोवेळी विशिष्ट मालिकेच्या नोटा काढून घेते आणि नवीन नोटा जारी करते. आम्ही दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेत आहोत पण त्या कायदेशीर निविदा राहतील.