रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे, त्यांच्याकडे भारतीय फलंदाज नसणे. या संघात २००८ मध्ये विराट कोहलीने एन्ट्री केली. तेव्हा दिल्लीने आपला देशांतर्गत क्रिकेटपटू विराटवर विश्वास दाखवला नाही. आरसीबीने विराचला घेतलं आणि आजही तो संघासोबत आहे. पण, विराट व्यतिरिक्त, आरसीबीकडे आजवर असा एकही भारतीय फलंदाज नाही जो अनेक वर्षांपासून संघासोबत राहिला असेल आणि ज्याने धावाही केल्या असेल.
एक हजाराहून अधिक धावा फक्त विराटच्या
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आजपर्यंत विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्याने आरसीबीसाठी आयपीएलमध्ये हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ७ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. पण, विराटशिवाय दुसरं कोण, याचे उत्तर कोणाकडेच नाही. देवदत्त पडिक्कल आणि केएल राहुल सारख्या फलंदाजांनी काही काळ संघासाठी चांगली कामगिरी केली. पण, नंतर ते इतर संघात गेले.
RCB साठी IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
- विराट कोहली – ७२६३
- राहुल द्रविड – ८९८
- देवदत्त पडिक्कल – ८८४
- पार्थिव पटेल – ७३१
- मनदीप सिंग – ५९७
चॅम्पियन संघांची स्थिती?
मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. ७ भारतीय खेळाडूंनी संघासाठी हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. केकेआर दोन वेळा चॅम्पियन आहे आणि ९ भारतीय फलंदाजांनी त्यांच्यासाठी हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. ४ वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जसाठीही ७ फलंदाजांनी हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
सध्या मुंबईत रोहित शर्माशिवाय ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि टिळक वर्मा आहेत. तर, चेन्नईकडे रुतुराज गायकवाड, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी, जडेजा आणि शिवम दुबे आहेत.