वाचा:
धरण परिसरासत पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी रात्री १६ हजार ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने भिडे पूल हा पाण्याखाली गेला होता. त्यानंतर पावसाचे प्रमाण हे कमी झाल्याने ५१३६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. दिवसभर तुलनेने पाऊस कमी होता. मात्र, सायंकाळनंतर धरण क्षेत्रात पाऊस आणखी वाढल्याने रात्री नऊ वाजण्याच्या सुमारे नऊ हजार क्युसेकने मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
धरण परिसरात संततधार राहिल्याने गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत खडकवासला धरणात सुमारे ४२ मिलिमीटर, क्षेत्रात १४२ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात १३४ मिलिमीटर आणि टेमघर धरण परिसरात ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी आठनंतर दिवसभर तुलनेने पाऊस कमी होता. खडकवासला धरण क्षेत्रात चार मिलिमीटर, पानशेत क्षेत्रात १६ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात १४ मिलिमीटर आणि टेमघर धरण क्षेत्रात ४३ मिलिमीटर पाऊस पडला.
वाचा:
या चारही धरणांमध्ये २१.५५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने या धरणामध्ये १.९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अन्य धरणांपैकी पानशेत धरणात ८.७८ टीएमसी, वरसगाव धरणात ८.७९ टीएमसी आणि टेमघर धरणात २.०० टीएमसी पाणीसाठा आहे.
गुंजवणी आणि वीर धरणातून विसर्ग सुरू
> वीर धरण हे शंभर टक्के भरले असल्याने या धरणातून निरा नदीत विसर्ग सुरू आहे. या धरणातून ३२२१४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गुंजवणी धरण हे सुमारे ९६ टक्के भरले आहे. या धरणातून सायंकाळी सहा वाजल्यानंतर ७३८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे गुंजवणी नदीकाठच्या रहिवाशांना सावधानता बाळगण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.
> पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण हे सुमारे ५९ टक्के भरले आहे. या ५.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
> सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली असून, या धरण क्षेत्रात १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात १७.३० टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
Thank you ever so for you article post.
I really like and appreciate your blog post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.