नागपूर: बुटीबोरीमध्ये शिक्षिका असलेल्याने आईने तिच्या मुलीसह कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम साईनगर येथील प्रभाग क्रमांक ७ मध्ये रविवारी (२१ मे) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली.चेतना शिरीष भक्ते (वय ३५) आणि हर्षिका उर्फ छवी शिरीष भक्ते (वय ११) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. मृत चेतनाचे पतीशी पटत नसल्याने ती आपल्या मुलीसह वडिलांच्या घरी राहत होती. उदरनिर्वाहासाठी ती परिसरातील एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. शनिवारी रात्री जेवण करून ती झोपण्यासाठी तिच्या खोलीत गेली. दरम्यान, रविवारी सकाळी १० वाजेनंतरही मुलगी आणि नात न उठल्याने वडील दिनेश गुरवे त्यांना उठवण्यासाठी गेले. खोलीचा दरवाजा ठोठावल्यानंतरही आतून प्रतिसाद आला नाही.

जिथे कधी भांडी घासली, आज त्याच रेस्टॉरंटची मालकीण झाली; १८ वर्षीय तरुणीची थक्क करणारी कहाणी
त्यानंतर शेजारील भाडेकरूच्या खोलीतून मुलीच्या खोलीत गेले असता मुलीने आत्महत्या केल्याचे त्यांना समजले. मुलगी आणि नात यांना मृतावस्थेत पाहताच वडिलांनी हंबरडा फोडला. त्यांनी आरडाओरड करताच सगळे धावून आले, त्यांनी मुलाला बोलावून घेतले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळ गाठलं. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृत चेतनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच मुलगी छावीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने बुटीबोरी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिची परिस्थिती पाहता डॉक्टरांनी तिला नागपूर येथील खासगी रुग्णालयात पाठवलं. पण, सारे प्रयत्न निष्फळ ठरले आणि उपचारादरम्यान छवीचा मृत्यू झाला.

मित्र-मैत्रिण फिरण्यासाठी गेले, रस्त्यातच नराधमांनी अडवलं, एकाने छेड काढली, दुसऱ्याने गोळी घातली

कौटुंबिक वाद आणि शाळेत होत असलेल्या अरोपांवरून महिलेने मुलीसह आत्महत्या केली असेल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी बुटीबोरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here