वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे असून काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केल्याचे व्हिडिओ समोर आले होते. मात्र, आता परिस्थिती जैसे थे दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस याकडे गांभीर्याने लक्ष देणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट…
अवजड वाहनांना कल्याण-शीळ मार्गावर प्रतिबंध असतानाही चिरीमीरी घेऊन सर्रास प्रवेश दिला जात आहे. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमलेल्या वॅार्डनच्या माध्यमातून वसूली केली जात आहे.आज सकाळी पत्रीपुल येथे अशाच एका अवजड वाहनाने दोन रिक्षांना धडक मारली. प्रशासनाने लक्ष द्यावे, असं ट्विट मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे.
आज सोमवारी कल्याणच्या पत्री पुलावर हा अपघात झाला आहे. सळई घेऊन जाणाऱ्या एका ट्रेलरमध्ये अचानक बिघाड झाला. ट्रेलर चालकाने यूटर्न घेत असताना त्याने समोरुन येणाऱ्या दोन रिक्षांना धडक दिली. या धडकेमध्ये रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात रिक्षामधील तीन प्रवासी जखमी झाले. या जखमी प्रवाशांवर कल्याण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
बुलडाण्यामध्ये सोमवारी अपघाताची मोठी घटना
बुलडाण्यामध्ये सोमवारी अपघाताची मोठी घटना घडली. पंढरपूरच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावातील भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. शेगावला परत येत असताना या वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये ३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.