म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक: माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्यातील सरकार लवकरच कोसळेल अशी भविष्यवाणी केली होती. त्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी राणेंच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे.

‘मी हस्तरेषाही बघत नाही अन ज्योतीषही पाहत नाही. सरकार पडेल कि टिकेल हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला. मी एक मानतो नियतीने आपल्याला काम करण्याची जी संधी दिली आहे त्या भुमिकेने आपण काम करत राहावे.’ असे सांगत भुजबळांनी राणेंना चिमटा काढला आहे.

आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाशी काडीचाही संबध नाही अशी भुमिका मांडत भुजबळ यांनी आदित्य ठाकरे यांना क्लिनचीट दिली आहे. ‘सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा काडीमात्र संबध नाही. उगीच कुणाची तरी बदनामी करणे योग्य नाही. मी मुंबईचा महापौर, आमदार होतो, गृहखातेही मी सांभाळलेले असल्याचे, ते म्हणाले.

वाचाः

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना भुजबळ यांनी राष्ट्रवादीतल्या वादावर सारवा सारव केली. पार्थ पवारांबाबत बोलतांना ते म्हणाले की, ‘ हे आमचे कुटुंब प्रमुख असून कोणी चुकत असेल तर कान पकडण्याचा त्यांना पुर्ण अधिकार असल्याचे समर्थन केले आहे.

वाचाः

‘पार्थ पवारच्या वादाबाबत भुजबळ यांना विचाले असता ते म्हणाले, पवार कुटुंबियांमध्ये कोणताही कलह नाही. कोणीही नाराज नाही. आम्हीही पवार कुटुंबियांपैकीच एक आहोत. पवार साहेब हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत ते ज्येष्ठ आहेत. घरचा कोणी चुकला तर त्यांना समजावून सांगणे हे त्यांचे काम आहे. अगदी मी चुकलो तरी माझा कान ते धरतात आणि मला सुध्दा ऐकवतात,’ असे ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here