Nitish Kumar to meet Mallikarjun Kharge sparks rumor to contend as Opposition face for Prime Minister; पंतप्रधानपदासाठी नितीशकुमारांची जुळवाजुळव? राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने चर्चा
नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी केवळ एक वर्षाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशातच सत्ताधारी पक्षाला सत्तेतून खाली खेचण्याकरता विरोधीपक्षांनी जोरदार कंबर कसल्याचे चित्र आहे. या रणनीतीचा भाग म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मागील काही दिवसांपासून सातत्याने सहकारी पक्षांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत आहेत. भाजपशी फारकत घेतल्यापासून नितीशकुमार राष्ट्रीय राजकारणात कमालीचे सक्रिय झाले असून ते सातत्याने भाजपविरोधात भूमिका मांडत आहेत. नितीशकुमारांनी २१ तारखेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी १२ एप्रिलपासून विविध सहकारी पक्षांतील नेत्यांच्या भेटींचा धडाका लावला आहे. या दोन्ही नेत्यांनी सर्वप्रथम देशातील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची याआधीही भेट घेतली होती. यानंतर काँग्रेसकडून हिरवा झेंडा मिळताच या जोडीने देशभरातील विविध प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरु केले होते. आमच्या बड्या नेत्यांवर बोलाल, तर मुलाहिजा ठेवणार नाही, शेलारांनी भरसभेत ‘मित्राला’ सुनावलं दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नितीशकुमारांनी भेट घेतली. तसेच केंद्र सरकार विरोधातील लढ्याला आपले संपूर्ण सहकार्य असेल असे अश्वासन त्यांनी केजरीवालांना दिले आहे. या भेटीसाठी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे देखील उपस्थित होते.
आम्ही काँग्रेसचे शिपाई, मला राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे; सोलापुरात नाना पटोलेंचं भाषण
नितीशकुमारांनी कोणाकोणाची घेतली भेट?
गेल्या महिन्यात २१ एप्रिल रोजी नितीशकुमारांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरीश रावत यांची भेट घेतली होती. तर, २४ एप्रिलला नितीशकुमारांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. यानंतर नितीशकुमार यांनी ९ मे रोजी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि १० मे रोजी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची रांची येथे भेट घेतली होती. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच ११ मे रोजी नितीशकुमारांनी मुंबईत येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.