Virat Kohli Injury and Health Update by RCB Head Coach Sanjay Bangar; WTC फायनलच्या तोंडावर विराट कोहलीला दुखापत; एका कॅचने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले, कोच म्हणाले…
बेंगळुरू: आयपीएल २०२३चा हंगाम आता प्लेऑफच्या टप्प्यात पोहोचला आहे. काल रविवारी झालेल्या लढतीत गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला. या मॅचमुळे मुंबई इंडियन्सचे प्लेऑफचे तिकीट निश्चित झाले. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जायंटस आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहे.गुजरातविरुद्धच्या लढतीत आरसीबीकडून विराट कोहलीने शतकी खेळी केली. पण संघाला विजय मिळवता आला नाही. या मॅचनंतर भारतीय संघाचे डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. विराटचे आयपीएलच्या १६व्या हंगामातील हे सलग दुसरे शतक ठरले. तो दमदार फॉर्ममध्ये असल्याचा आनंद एका बाजूला असताना आता वाईट बातमी समोर आली आहे. गुजरातविरुद्धच्या लढतीत विराट कोहलीच्या गुढघ्यांना दुखापत झाली. या दुखापतीमुळेच तो अखेरच्या काही षटकात मैदानावर दिसला नाही. Tilak Varma Revenge: ही रात्र अर्शदीप सिंग कधीच विसरणार नाही; तिलक वर्माने १२व्या दिवशी घेतला बदला विराटची ही दुखापत भारतीय क्रिकेट संघाचे टेन्शन वाढवणारी आहे. कारण भारताला पुढील महिन्यात ७ जुनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच खेळायची आहे. WTC फायनलच्या आधी विराट सारख्या महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत होणे हे भारतासाठी चांगली नाही.
आरसीबीचे कोच संजय बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विराटची दुखापत गंभीर नाही. विराटने शतकी खेळीकेल्यानंतर फिल्डिंगमध्ये विजय शंकरचा शानदार कॅच घेतला होता. हा कॅच घेताना त्याला दुखापत झाली. विराट कोहलीची मदत करण्यासाठी फिजिओ मैदानात आले. पण त्याला फिल्डिंग सोडावी लागली. अखेरच्या ५ षटकात विराट डगआउटमध्ये बसला होता. विराटच्या गुढघ्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत किरकोळ आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, असे बांगर म्हणाले.
विराटने चार दिवसात दोन शतक झळकावली आहेत. दोन दिवसांपूर्वी तो ४० ओव्हर मैदानावर होता आणि आज तो ३५ ओव्हर मैदानावर होता. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ जूनपासून WTCची फायनल खेळायची आहे. यासाठी मंगळवारी भारताचे सात खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहेत, त्यात विराट कोहलीचा देखील समावेश आहे. इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळणारा चेतेश्वर पुजारा संघासोबत असेल.
अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं