मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वनेही रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे उशिरा का होईना चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ( from route )

वाचा:

मार्गावर मुंबई सेंट्रल व वांद्रे टर्मिनस येथून सावंतवाडी रोड आणि कुडाळ स्टेशनपर्यंत गणपती स्पेशल ट्रेन धावणार आहेत. एकूण ५ विशेष ट्रेन सोडण्यात येणार असून २० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची कोंडी दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीने या ट्रेन सोडण्यात येणार आहेत. दोन गणपती स्पेशल ट्रेन मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड, दोन गणपती स्पेशल ट्रेन वांद्रे टर्मिनस ते सावंतवाडी रोड तर एक ट्रेन वांद्रे टर्मिनस ते कुडाळ दरम्यान धावणार आहे. या सर्व गाड्यांना विशेष प्रवासभाडे द्यावे लागेल. या गाड्यांचे आरक्षण उद्यापासून खुले होईल, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसहून सुटणाऱ्या गाड्या बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा या ठिकाणी थांबा घेत कोकणाकडे रवाना होतील व आठवड्यातून दोनदा धावतील असे नमूद करण्यात आले आहे. १७ ते ३० ऑगस्ट या दरम्यान या २० फेऱ्या होणार आहेत.

वाचा:

दरम्यान, मध्य रेल्वे कोकणासाठी १६२ विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. उद्या १५ ऑगस्टपासून या गाड्यांसाठी बुकिंग सुरू होणार असून पहिली गाडी देखील उद्याच सुटणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रत्नागिरी, कुडाळ व सावंतवाडीसाठी या गाड्या सुटणार आहेत. या सर्व गाड्या केवळ चाकरमान्यांसाठी राखीव असतील. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत या गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या तिकीट आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in या वेबसाइटवर तिकीट बुक करता येणार आहे. विशेष रेल्वे गाड्यांना जाणाऱ्या सर्व प्रवाशांना गाडीत प्रवेश करताना, प्रवासात व अखेरच्या स्थानकांवर अशा सर्व ठिकाणी ‘कोविड १९’च्या अनुषंगाने प्रशासनाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावे लागतील, असे रेल्वेनं स्पष्ट केले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here