हे प्रकरण सन २००५ मधील आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी येथे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या काही दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला होता. या प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांबरोबरच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनेही केला होता. हा हल्ला पाकिस्तानी दहशवाद्यांनी केला होता, असे तपासात आढळून आले होते. हा दहशवादी हल्ला करण्यात आणि हल्ल्याचा कट रचण्यात पाकिस्तानचा दहशतवादी आसिफ उर्फ कारी उर्फ सैफुल्ला याचा समावेश होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आसिफ हा जैश-ए-मोहम्मद विभागीय कमांडर या पदावर जम्मू आणि काश्मीरमध्ये काम करत होता. तो दिल्लीत दहशतवादी हल्ला यशस्वी करण्याच्या कामाला जुंपलेला होता. मात्र, या विशेष अभियानामध्ये स्पेशनल सेलच्या टीमने एका चकमकीनंतर दहशतवाद्यांकडून ६३ लाख नकद रुपये, ५ किलो आरडीएक्स, १२ हँड ग्रेनेड, १० इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर, ८ मोबाइल फोन, अनेक चीनी हत्यारे, एक सॅटेलाइट फोन आणि जम्मू आणि काश्मीरच्या नावाने एख बनावट ओळखपत्र हस्त केले होते. आरोपींनाही टीमने त्यावेळी पकडले. हे प्रकरण गेल्या कित्येक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होते. गेल्या वर्षी १८ जून २०१९ रोजी सैफुल्लासह अन्य आरोपींना अलाहाबाद कोर्टाने दोषी ठरवले होते. त्यानंतर ती चकमकीही योग्य असल्याचे सिद्ध झाले. यानंतर स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी हे प्रकरण पोलिस मुख्यालयामार्फत गृहखात्याला गेल्या वर्षीच पुरस्कार श्रेणीसाठी पाठवले होते. त्यामुळे त्या जवानांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाचा-
देशातील सर्वोच्च शौर्य पदक मिळवलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या या यादीत यांच्या नावाा देखील समावेश झाला आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत ९ शौर्य पदके आहेत, परंतु आता आणखी एक शौर्य पदक मिळण्याच्या घोषणेसह, दिल्लीतील सर्वाधिक शौर्य पदके मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट झाले आहे. मोहनचंद शर्मा हे अशोक चक्र प्राप्त करणारे दिल्ली पोलिसांमधील एकमेव अधिकारी आहेत.
वाचा-
वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I like the valuable information you provide in your articles.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.