नागपूर:
राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल बुधवारी लागले. , धुळे, , , अकोला आणि या जिल्हा परिषदांच्या निवडणुकींसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी झाली. सहापैकी पाच जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने जिल्हा परिषदांमध्येही भाजपची कोंडी केली आहे. विशेष म्हणजे भाजपचा गड असलेल्या नागपुरात विरोधकांनी एकत्र येऊन भाजपला धूळ चारली आहे. जिल्हा परिषदेत मात्र भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.

नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि भाजपला समसमान २३ जागा मिळाल्या. पण काँग्रेससह महाविकास आघाडीचा विजय झाला. पालघरमध्येही महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा आहेत. वाशिम आणि अकोल्यात वंचित आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. सहाही जिल्हा परिषदांमधील एकूण जागांचा एकत्रित विचार केल्यास भाजपला सर्वाधिक जागा आहेत. मात्र महाविकास आघाडीमुळे भाजपला सत्ता राखता आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या एकूण ३३२ जागांपैकी भाजपला १०३ जागा मिळाल्या. जे चित्र महाविकास आघाडीच्या स्थापनेमुळे राज्यात पाहायला मिळालं तसंच ते जि.प. पातळीवर दिसत आहे.

भाजपाच्या जागांमध्ये दुप्पट वाढ

या सहा जिल्हा परिषदांमध्ये गेल्यावर्षीच्या निवडणुकांमध्ये केवळ ५३ सदस्य भाजपाचे होते. ती संख्या आता १०३ वर पोहोचली आहे. ही वाढ जवळपास दुप्पट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या यापूर्वी या ६ जिल्हा परिषदेत १४८ जागा होत्या, त्या आता कमी होत ११८ वर आल्या आहेत.

नंदूरबार आणि धुळ्याचे निकाल तर विशेष उल्लेखनीय ठरले आहेत. धुळ्यात भाजपाने प्रथमच स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. नंदूरबार जिल्हा परिषदेत भाजपाचा केवळ एक सदस्य होता, आता भाजपाने २३ जागांवर झेप घेतली आहे.

सहा जिल्हा परिषदांमधील एकूण जागा ३३२

पक्षनिहाय जिंकलेल्या जागा –
भाजप – १०३
काँग्रेस – ७४
राष्ट्रवादी – ४३
शिवसेना -४८
इतर – ६१
—————–

नागपूर निकाल :
एकूण जागा : ५८
काँग्रेस : ३०
राष्ट्रवादी (शेकाप): ११
भाजप : १५
शिवसेना : १
अपक्ष : १
——————-

पालघर जिल्हा परिषद निकाल :

एकूण जागा : ५७
शिवसेना : १८
माकपा: ६
भाजप : १०
राष्ट्रवादी : १५
बविआ: ४
मनसे: ०
अपक्ष : ३
काँग्रेस : १
——————

वाशीम जिल्हा परिषद निकाल:
एकूण जागा : ५२
राष्ट्रवादी : १२
काँग्रेस : ०९
शिवसेना : ०६
वंचित बहुजन आघाडी : ०८
भाजप : ०७
जनविकास आघाडी : ०७
अपक्ष : ०२
स्वाभिमानी शेतकरी संघटना : ०१
———————

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here