नवी दिल्ली: भारत-तिबेट सीमा पोलिसांनी (ITBP) मे-जून या काळात पूर्व लडाखमध्ये आपल्या अदम्य शौर्याचे दर्शन घडवणाऱ्या जवानांना शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. च्या शूर जवानांनी चीनी सैनिकांच्या नाकी नऊ आणले होते. १५ जूनला लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या संघर्षादरम्यान चीनचे देखील ४० सैनिक मारले गेले होते. (itbp recommends gallantry medals for its brave jawans)

ITBP च्या जवानांनी चीनी सैनिकांच्या नाकी नऊ आणले

ITBP च्या जवानांनी पूर्व लडाखमधील हिंसक संघर्षाच्या वेळी शील्डचा प्रभावी वापर केला. या वेळी पराक्रमासह संख्येने अधिक असलेल्या चीनी सैनिकांचा सामना करताना भारतीय जवानांनी त्यांना रोखून धरले आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवली. भारतीय जवानांनी उत्कृष्ट युद्ध कौशल्याचे दर्शन घडवत खांद्याला खांदा लावून मोठ्या हिमतीने संघर्ष केला आणि लष्कराच्या अनेक जखमी जवानांना सुरक्षित ठिकाणी नेले. ITBP च्या जवानांनी संपूर्ण रात्रभर चीनी सैनिकांचा सामना केला आणि १७ ते २० तास त्यांनी कारवाई करत चीनी सैनिकांना रोखून धरले. उंच भागांमध्ये युद्ध कसे करावे याचे प्रशिक्षणामुळे हिमालयात तैनात असलेल्या ITBP च्या जवानांना युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाची क्षेत्रे सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले आहे.

चीनी सैनिकांना चांगला धडा शिकवणाऱ्या २१ शूर जवानांच्या नावाची शिफारस ITBP ने केली आहे. ITBP चे डीजी एस. एस. देसवाल यांनी एकूण २९४ ITBP जवानांना पूर्व लडाखमध्ये चीनी सैनिकांचा सामना केल्याबद्दल डीजी प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान केले आहे. तर इतर सहा जवानांना छत्तीसगडमधील लक्षलवाद्यांविरोधातील अभियान यशस्वी केल्याबद्दल जीडी प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान केले आहे.

वाचा-

करोनाविरोधातही ITBP जवानांचे उल्लेखनीय कार्य

या बरोबरच ITBP ने आपल्या ३१८ जवानांच्या नावांसह ४० इतर केंद्रीय सशस्र पोलिस दलातील जवानांची नावे केंद्रीय गृहमंत्री स्पेशन ऑपरेशन ड्यूटी मेडलसाठी पाठवली आहेत. या सर्वांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे. ITBP जानेवारीपासूनच करोनाविरोधात काम करत आहे. ITBP नेच छावला येथे देशातील पहिला १००० बेडचे क्वारंटीन केंद्र उभारले. यामध्ये वुहान आणि नंतर इटलीहन आलेल्या भारतीय नागरिकांना ठेवण्यात आले.

वाचा-
या बरोबरच ITBP नवी दिल्ली येथे १० हजार बेड असलेले जगातील सर्वात मोठे सरदार कोविड केअर सेंटर आणि रुग्णालय देखील संचलीत करत आहे.

ही बातमी देखील वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here