पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याशी झालेल्या संघर्षात शौर्याने लढा देणाऱ्या २१ जवानांना शौर्य पुरस्कार मिळावेत यासाठी आयटीबीपीचे महासंचालक एस. एस. देसवाल यांनी शिफारस केली आहे.
आयटीबीपीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलिस दलाच्या महासंचालकांनी मे-जूनमध्ये पूर्व लडाखमध्ये चीनी सैनिकांशी सामना करणाऱ्या २१ जवानांना शौर्य पदकाची शिफारस केली आहे. त्याशिवाय २९४ आयटीबीपी जवानांना ‘डीजी प्रशस्तिपत्र’ देण्याची शिफारस केली आहे.
वाचा ही बातमी:
लडाखमध्ये चिनी सैन्याने केलेल्या दगडफेकीला भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तर दिले. काही ठिकाणी सैनिकांनी चिनी सैन्यासह १७ ते २० तास युद्ध केले, अशी माहिती आयटीबीपीने दिली आहे.
नक्की वाचा-
आयटीबीपी जवान केवळ सैनिकांची ढालच बनले नाहीत, तर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीलाही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आयटीबीपी जवानांनी खांद्याला खांदा लावून लढा दिला आणि जखमी भारतीय सैनिकांना सुखरूप परत देखील आणले, असे आयटीबीपीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
ही बातमी देखील वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times