कोहलीने १६ व्या सीझनमध्ये दोन शतके झळकावली
आयपीएल २०२३ वैयक्तिकरित्या कोहलीसाठी उत्कृष्ट ठरले आहे. त्याने आपल्या संघासाठी १४ सामन्यांमध्ये १३९ च्या स्ट्राइक रेटने ६३९ धावा केल्या, ज्यात २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, असे असूनही त्यांचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नाही. गुजरातविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतर कोहलीही निराश दिसत होता.
कोहलीला दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होण्याचा सल्ला पीटरसनने दिला. मात्र, भविष्यात असं होण्याची शक्यता फारचं कमी आहे. कोहलीने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की, जोपर्यंत तो आयपीएल खेळत आहे तोपर्यंत तो आरसीबीसोबतच राहणार आहे.
विराट कोहलीची होम टीम दिल्ली आहे. दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळून त्याने आंतरराष्ट्रीय संघात स्थान निर्माण केले. पण, जेव्हा आयपीएलच्या पहिल्या लिलावात त्याला विकत घेण्याची वेळ आली तेव्हा दिल्ली फ्रँचायझीने त्याला विकत घेतले नाही.
विराट कोहली हा आयपीएलमधील पहिला खेळाडू आहे ज्याने कोणत्याही आपल्या संघासाठी ७००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कोहलीची ओळख बनवण्यात आरसीबीचाही मोठा हात आहे. अशा परिस्थितीत, तो आता इतर कोणत्याही फ्रेंचायझीमध्ये सामील होईल, याची शक्यता फार कमी आहे.