नवी दिल्ली : करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशाचा ७४ वा अतिशय साध्या पद्धतीनं पार पडतोय. यांनी आज प्रथम राजघाटावर स्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर नुकतंच ध्वजारोहन पार पडलंय. आज स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात कोणकोणते मुद्दे असतील यावर देशाचंच नाही तर जगाचं लक्ष लागलंय. दिल्लीतील या कार्यक्रमासाठी जवळपास ४००० लोकांना आमंत्रित करण्यात आलंय.
(अपडेट बातमीसाठी वेबपेज रिफ्रेश करा)

Live पंतप्रधान नरेंद्र मोदी :

– पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्याच्या दिशेनं देश पुढे वाटचाल करतोय. वेगवेगळ्या सेक्टर्सचे जवळपास ७ हजार प्रोजेक्टस ओळखण्यात आलेत. ही एक प्रकारे पायाभूत सुविधांमध्ये एक नवी क्रांती असेल : पंतप्रधान मोदी

– जगातील मोठ-मोठ्या कंपन्या आज भारताकडे वळत आहेत. ‘मेक इन इंडिया’सोबत ‘मेक फॉर वर्ल्ड’ मंत्रासोबत पुढे वाटचाल करायला हवी : पंतप्रधान मोदी

– भारतात परराष्ट्र गुंतवणुकीनं देशातील आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडलेत. भारतात परराष्ट्र गुंतवणुकीत १८ टक्क्यांची वाढ झालीय. हा विश्वास सहजासहजी येत नाही : पंतप्रधान मोदी

– वन नेशन्स – वन टॅक्स, दिवाळखोरी आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या बँकांचं विलया आज देशाचं वास्तव आहे : पंतप्रधान मोदी

– ‘लोकल फॉर वोकल’ आपल्या आयुष्याचा मंत्र बनायला हवा : मोदी

– कुणी विचार केला होता की देशातील गरिबांच्या जन धन खात्यात हजारो – लाखो कोटी रुपये थेट पोहचवले जातील? कुणी विचार केलेला की शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एपीएमसी कायद्यात एवढे मोठे बदल केले जातील : पंतप्रधान मोदी

– केवळ काही महिन्यांपर्यंत एन ९५ मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटर्स आपण परदेशातून आयात करत होतो. आज या सगळ्या वस्तूंत भारत न केवळ स्वत:च्या गरजा भागवतोय पण इतर देशांनाही मदत पुरवतोय : पंतप्रधान मोदी

– आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ आयात कमी करणं नाही तर आपली क्षमता, सर्जनशीलता, कौशल्यही वाढवायचे आहेत : मोदी

– एक वेळ अशी होती जेव्हा आपली कृषी व्यवस्था मागासलेली होती. देशवासियांचं पोट कसं भरायचं? अशी मोठी चिंता देशासमोर होती. आज आपम केवळ भारतच नाही तर जगाचं पोट भरू शकतो : पंतप्रधान मोदी

– करोना संकटकाळात १३० कोटी भारतीयंनी आत्मनिर्भर भारत बनवण्याचा संकल्प हाती घेतला. मला आपल्या देशाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे : पंतप्रधान मोदी

– अखेर केव्हापर्यंत आपल्याच देशातून गेलेला कच्चा माल फिनिश्ड प्रोडक्ट बनून भारतात परतत राहील… आत्मनिर्भर भारत ही देशाची गरज : पंतप्रधान मोदी

– विस्तारवादाच्या विचारानं काही देशांना गुलाम बनवलं… पण ही गोष्ट इथंच संपली नाही. भीषण युद्ध आणि भयानकते दरम्यान भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात कमी आलेली नाही : पंतप्रधान मोदी

– गुलामीचा असा कोणताही कालखंड नाही जेव्हा हिंदुस्तानातील कोणत्याही कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यासाठी प्रयत्न झाले नाही, प्राण अर्पण करण्यात आले नाहीत : पंतप्रधान मोदी

– पुढच्या वर्षी आपण स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहोत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

– करोनाच्या या संकटकाळात ‘सेवा परमो धर्मा’ची भावना आपल्यासोबत आहे. आपल्या आयुष्याची पर्वा न करता डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्बुलन्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, संरक्षण व्यवस्था, अनेक लोक २४ तास काम करत आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

– पंतप्रधानांकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

– मेरे प्यारे देशवासियो म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

– लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

– लाल किल्ल्यावर पोहचण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरूनच देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊ केल्या.

संबंधित बातम्या :

वाचा :
वाचा :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here