मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकीनंतर मुंबईत भाजपचाच महापौर बसेल, असे वक्तव्य भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केले. भाजपचा महापौर हा एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादानेच बसेल. आमचं तसं ठरलं आहे, असे शेलार यांनी सांगितले. ‘मटा कॅफे’मध्ये झालेल्या विशेष मुलाखतीमध्ये आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातील राजकीय समीकरणांबाबत भाष्य केले. यावेळी शेलार यांना मुंबई महानगरपालिकेवर यंदा शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यापैकी कोणाचा महापौर बसणार, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी आशिष शेलार यांनी स्पष्टपणे आणि कोणताही आडपडदा न ठेवता मुंबई महानगरपालिकेत भाजपचाच महापौर बसणार, असे सांगितले.

मुंबई महानगरपालिकेत भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे, रिपाई आणि रालाआचे सदस्य असे सर्वजण मिळून आम्ही १५१ जण निवडून आणू. मुंबईत भाजपचाच महापौर होईल, पण तो एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने होईल. आम्ही तिघे एकत्रच आहोत. यामध्ये कितीह बुद्धिछल करायचा प्रयत्न केला तरी आकडेवारी बदलणार नाही. मी स्पष्टपणे सांगत आहे की, मुंबईत महापौर हा भाजपचाच होणार. एनडीए म्हणून भाजपचा महापौर होणार, हे आमच्यात अगोदरच ठरले आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात आणखी दोन राजकीय बॉम्ब फुटायचे बाकी, त्यानंतर राजकारण स्थिर होईल: प्रकाश आंबेडकर

या मुलाखतीमध्ये आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडून स्वत:च्या घरी गेले तेव्हा रस्त्यावर किती लोक होते? कधी आपण आकडे पाहिलेत? दोन-चार ठिकाणी २५-५० लोकं उभी होती. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीतून मुंबईत परतले तेव्हा शिवसैनिकांनी रस्त्यावर किती आंदोलनं केली? महाविकास आघाडीची मुंबईत झालेली सभा बीकेसीच्या पार्किंग लॉट म्हणून वापर होणाऱ्या मैदानात झाली. ही सगळी परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी सहानुभूतीची लाट आहे, असे कसे म्हणता येईल? विशिष्ट टोळकं मिळून याचा बाऊ करत आहे. या सगळ्याचं योग्य मूल्यमापन जनता निवडणुकीत करेल, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

काम केलं तर सत्कार करेन, नाही केलं तर नारळ देऊन घरी पाठवेन, मुख्यमंत्र्यांचा सज्जड दम

तुमच्या पाठिशी जनतेची सहानुभूती असेल तर वरळीत निवडणूक होऊन जाऊ द्या: आशिष शेलार

राज्यातील शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असली तरी मुंबईतील त्यांची संघटना शाबूत आहेत, हा दावा आशिष शेलार यांनी फेटाळून लावला. मुंबईत एकूण सहा खासदार आहेत. त्यापैकी शिवसेनेचे ३ खासदार भाजपच्या कृपेने निवडून आले होते. यापैकी दोन आमदार आणि चार आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील दोन नगरसेवकही शिंदे यांच्यासोबत गेले. जनतेची एवढीच सहानुभूती ठाकरेंच्या पाठिशी असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे किंवा इतरांना सल्ला देण्याच्या फंदात पडू नये. आदित्य ठाकरे हे भाजप, शिवसेना आणि रिपाईचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींचा फोटो लावून प्रचार केला, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासाठी सभा घेतील होती. त्यामुळे आदित्य ठाकरे हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत. ते स्वैराचार करून दुसऱ्यासोबत गेले. त्यामुळे त्यांन वरळीतील आमदारकीचा राजीनामा द्यावा. वरळीत निवडणूक होऊन जाऊ द्या. मग ‘दूध का दूध, पानी का पानी होईल’, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

47 COMMENTS

  1. amoxicillin online purchase: [url=https://amoxicillins.com/#]amoxicillin 500mg capsules antibiotic[/url] amoxicillin 500mg price

  2. amoxicillin 500 mg capsule: [url=https://amoxicillins.com/#]amoxicillin 750 mg price[/url] buy amoxicillin online with paypal

  3. over the counter amoxicillin canada: [url=https://amoxicillins.com/#]cost of amoxicillin 30 capsules[/url] amoxicillin 500 mg without a prescription

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here