लग्न आटोपून ते दर्यापूरकडे येत असताना पाठीमागून एका मोठ्या वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत १२ जण गंभीर जखमी झाले. यात २ जणांचा जागीच मृत्यू झाला. बाकीच्यांना दर्यापूर येथे रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टारांना जेव्हा समजलं की परिस्थिती फार गंभीर आहे तेव्हा त्यांनी अमरावतीला नेण्यास सांगितलं. मात्र, वाटेतच दोघांचा देखील मृत्यू झाला. बाकी ७ जणांवर अमरावती जिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहेत. या अपघातात लहान मुलांचा देखील समावेश आहे. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. जखमींना तातडीने त्यांनी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक तपास खल्लार पोलीस करत आहेत.