आज नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी , पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित , नगर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुश्रीफ यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून फडणवीस यांच्यावर तोफ डागली.
वाचा:
देवेंद्र फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती केले जाणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, ‘सुशांत सिंह राजपूत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि आता त्यांना प्रभारीपद दिले जात आहे, हे सर्व पाहता या प्रकरणात राजकारणच आहे, अशी प्रतिक्रिया आमच्या सर्व नेते मंडळींनी दिली आहे. माझेही तेच मत आहे. पाच वर्षे ज्यांनी स्वतः गृहखाते सांभाळले तेच पोलिसांवर संशय व्यक्त करतात ही दुर्दैवी गोष्ट आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
वाचा:
मुश्रीफ यांनी यावेळी करोनाच्या अनुषंगाने ही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखणे व मृत्युदर कमी करणे, हे आज आपल्या समोरील आव्हान आहे. रुग्णांना ताबडतोब उपचार देण्याची व्यवस्था करणे, लवकरात लवकर जास्तीत रुग्ण बरे कसे होतील त्या दृष्टीने नियोजन करणे, मृत्यूदर कमी करणे, हे आपल्यासमोरील आव्हान आहे.’
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times