पूजा ददलानीचं मानधन
२०१२ मध्ये पूजाने शाहरुखसोबत काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून ते आजपर्यंत एकत्र काम करत आहेत. डीएनएमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, शाहरुखचे काम सांभाळण्यासाठी पूजाला वर्षाला ७ ते ९ कोटी रुपये फी मिळते. पूजाच्या पतीचे नाव हितेश गुरनानी असून ते व्यावसायिक आहेत. या दोघांना रेना नावाची मुलगी आहे. २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या Mensxp च्या अहवालानुसार पूजाची एकूण संपत्ती ४० ते ५० कोटी रुपयांच्या दरम्यान होती. गेल्या दोन वर्षांत त्यात आणखी वाढ झाली असावी असेही बोलले जाते. याशिवाय पूजाकडे निळ्या रंगाची मर्सिडीज कार आहे. तिचे मुंबईतील वांद्रे भागात घर आहे. ज्याचे इंटीरिअर डिझाइन गौरी खानने केले आहे.
आर्यन खान केसमध्ये पूजाचं काम
ऑक्टोबर २०२१ रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. २०२२ मध्ये, NCB ला तपासात आढळले की आर्यनकडून कोणतेही ड्रग्ज जप्त करण्यात आले नव्हते. हे प्रकरण सुरू असेपर्यंत पूजा आर्यनला भेटण्यासाठी एनसीबी ऑफिस आणि कोर्टात नियमित जायची. यादरम्यान ती सतत मीडियाच्या नजरेत असायची. ती कोण आहे, काय करते, खान कुटुंबाच्या किती जवळची आहे हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता होती.
खान कुटुंबाशी पूजाचे संबंध
शाहरुख आणि गौरी क्वचितच सुनावणीला हजर होते. कोर्टाबाहेर फक्त पूजा दिसायची. मीडिया रिपोर्टनुसार आर्यनच्या खटल्याची सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी न्यायालयात झाली, त्यावेळी पूजा तिथे उपस्थित होती. आर्यनला जामीन न मिळाल्याने पूजा भावूक झालेली. यावरून असा अंदाज आला की पूजाचे शाहरुखच्या कुटुंबाशी आणि विशेषतः आर्यनसोबत खूप चांगले संबंध आहेत.