जळगाव: यावल तालुक्यातील न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात मध्य प्रदेशातील महिलेने तब्बल २६ बोटांच्या बाळाला जन्म दिला आहे. या नवजात बाळाला दोन्ही हाताला एक- एक तर दोन्ही पायाला तब्बल दोन- दोन बोटे जास्त आहेत. ही वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना असल्याचा दावा डॉक्टरांकडून केला जात आहे. दरम्यान, जन्मलेले बाळ आणि बाळाची आई सुखरूप आहेत. ज्योती बारेला (वय २० रा, झिरन्या जि. खरगोन, मध्यप्रदेश) असं या दुर्मिळ बाळाला जन्म देणाऱ्या मातेचे नाव आहे.ज्योती बारेला या महिलेला प्रसूतीसाठी शनिवारी मध्यरात्री यावल तालुक्यातील न्हावी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. पहाटेच्या सुमारास ज्योती बारेलाची प्रसूती झाली. मात्र, ज्या बाळाचा जन्म झाला होता, ते पाहून डॉक्टर तसेच रुग्णालयातील कर्मचारी, तसेच बाळाचे नातेवाईक यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या बाळाला पाहून उपस्थित सर्वच अवाक् झाले.

Virat Kohli: विराट कोहली RCB ला सोडणार, दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणार? माजी खेळाडूच्या ट्वीटने खळबळ
सर्वांनी आश्चर्य व्यक्त करण्यामागचं कारणंही मोठं होतं. सामान्यतः हातापायाचे मिळून २० बोटे असतात. जे बाळ जन्माला आले त्याच्या हातापायाला तब्बल २६ बोटे आहेत. या नवजात बालकाच्या दोन्ही हाताला प्रत्येकी सहा बोटे आणि दोन्ही पायाला प्रत्येकी सात बोटे असे एकूण २६ बोटे या बाळाला आहे. विशेष म्हणजे या बाळाला जन्म देणारी माता व तसेच हे बालक हे दोघे सुखरूप असून दोघांची प्रकृती चांगली आहे. न्हावी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कौस्तुभ तळले, परिचारिका कोमल आदिवाले, सुमित बारसे, सरला परदेशी, पौर्णिमा कोळंबे, अरुण पाटील यांनी या महिलेची सुखरुप आणि यशस्वी प्रसूती केली.

बालकाला पाहण्यासाठी रुग्णालयात झाली मोठी गर्दी

आतापर्यंत आपण २१ किंवा २२ बोटे तसेच २४ बोटे असलेले मुले जन्माला आली असल्याचे ऐकले असेल पाहिले असेल. मात्र, तब्बल २६ बोटांचे बाळ जन्माला येणे ही वैद्यकीय इतिहासातील अतिशय दुर्मिळ घटना आहे, असे मत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. कौस्तुभ तळले व सावदा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश चौधरी यांनी व्यक्त केले.२६ बोटे असलेल्या बाळ जन्माला आल्याची वार्ता वाऱ्या सारखी परिसरातील गावांमध्ये पोहचली. त्यामुळे या दुर्मिळ म्हटल्या जाणाऱ्या बालकाला पाहण्यासाठी अनेकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

जिथे कधी भांडी घासली, आज त्याच रेस्टॉरंटची मालकीण झाली; १८ वर्षीय तरुणीची थक्क करणारी कहाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here