पुणे: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं राज्यपाल यांनी आज पुणे येथील विधान भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री यावेळी उपस्थित होते. यावेळी दोघांच्या झालेल्या मिनिटभराच्या भेटीचा व्हिडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे.

वाचा:

राज्यपाल कोश्यारी हे सकाळी ध्वजारोहणासाठी पोहोचले तेव्हा अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. ‘तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या राज्यात आलो आहे’ (आपकी परमिशन लिए बगैर आपके राज्य मे आय है…) अशी मिश्किल टिप्पणी राज्यपाल कोश्यारी यांनी केली. त्यावर अजित पवार यांनीही हसून ‘अरे ऐसा कुछ नही’ असं म्हणत राज्यपालांना प्रतिसाद दिला.

वाचा:

भगतसिंह कोश्यारी हे अनुभवी राजकारणी आहेत. त्यांनी उत्तराखंडचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे. देशातील राजकारणाचीही त्यांना चांगली जाण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता किती ताकदीचा आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्र, प्रभावक्षेत्र कोणतं आहे, याची उत्तम माहिती कोश्यारी यांना असल्याचं आजच्या भेटीत दिसून आलं. पुणे जिल्ह्यात अजित पवारांचा दबदबा असल्याचं कोश्यारी यांना चांगलं माहीत आहे. त्याच अनुषंगानं त्यांनी ही मिश्किल टिप्पणी केल्याचं बोललं जातं.

पुण्यातील ध्वजारोहण सोहळ्याचा हा व्हिडिओ पुणे विभागीय माहिती कार्यालयानं ट्विटरवर शेअर केला आहे. त्यातच राज्यपाल व अजित पवार यांच्यातील हे काही सेकंदांचं संभाषण ऐकायला मिळत आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here