नागपूर: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील न्यू हायवे स्टार ढाब्यासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकावर आदळली. या अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि चुलत भाऊ गंभीर जखमी झाले आहे. जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कन्हान (पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान परिसरात रविवारी मध्य रात्री ही घटना घडली.परवेझ खुर्शीद अन्सारी ३६ वर्ष आणि आफिफा परवेझ अन्सारी (१२) अशी मृतांची नावे आहे,तर अमराह परवेझ अन्सारी (३३) आणि चालक नदीम नाइस अन्सारी (२८) अशी जखमींची नावे आहेत. चारही शारा, तालुका दामपूर जिल्हा बिजनौर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहेत. नदीम हा अमराहचा मामा आहे आणि तो नेहमी कामासाठी बंगळुरु (कर्नाटक) येथे जात असतो.

Jalgaon News: वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना! २६ बोटांच्या बाळाचा जन्म, जळगावात चर्चाच चर्चा
हे चौघेही KA-04/NC-0042 क्रमांकाच्या कारने दिल्लीहून बंगळुरू नागपूरमार्गे जात होते. कन्हान परिसरात येताच नदीमचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगात असलेली कार दुभाजकाला धडकली. परवेझ आणि अफिफाचा जागीच मृत्यू झाला, तर अमराह आणि नदीम गंभीर जखमी झाले. दोघांना नागपूर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी अमरा यांच्या फिर्यादीवरून कारचालक नदीमविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पराग फुलझेले करीत आहेत.

बस अर्ध्यापर्यंत कापली गेली, बुलढाणा अपघातात ९ जणांनी गमावले प्राण

हे चौघे रविवारी सकाळी सातच्या सुमारास नवी दिल्लीहून बंगळुरूला निघाले होते. लांबचा प्रवास असल्याने त्यांनी नागपूर शहरात राहण्याचा बेत आखला. मात्र, नागपूर शहरात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या कारला अपघात झाला. जखमी अमरहला शुद्धीवर आल्यानंतर तिला कळले की तिचा नवरा आणि मुलगी मरण पावली आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बेल वाजवताच कुत्रा अंगावर धावून आला, जीव वाचवण्यासाठी डिलिव्हरी बॉयची तिसऱ्या मजल्यावरुन उडी, अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here