बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरुत झालेल्या मुसळधार पावसामुळे अंडरपासमध्ये पाणी साचलं. या पाण्यातून कार नेण्याचा प्रयत्न करत चालकाच्या अंगलट आला. कारमध्ये इन्फोसिसमध्ये काम करणारी इंजिनीअर तरुणी आणि तिचं कुटुंब होतं. अंडरपासमध्ये जास्त पाणी साचल्यानं कार बुडू लागली. कारमध्ये असलेलं कुटुंब सुदैवानं वाचलं. मात्र इंजिनीअर तरुणी रेखा दुर्दैवी घटनेतून वाचू शकली.कार अंडरपासमध्ये जाण्यापूर्वी नेमकं काय घडलं याची माहिती रेखाचा मोठा भाऊ बतुला संदीपनं दिली. ‘अंडरपासमध्ये तुंबलेलं पाणी पाहता मी सगळ्यांना कारबाहेर पडण्याचा सल्ला दिला. मात्र चालकाचा विचार वेगळा होता. अंडरपासमधून कार सुरक्षितपणे बाहेर काढतो, असं त्यानं खात्रीशीरपणे माझ्या कुटुंबाला सांगितलं. कुटुंबियांनी त्याच्यावर विश्वास दाखवला,’ असं संदीपनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.
टायर पंक्चर झालाय वाटतं, जरा बघतेस का? होणाऱ्या अहोंची विनंती; एअरहोस्टेस खाली उतरली अन्..
कार अंडरपासमधून सुरक्षितपणे जाईल, असं चालक आत्मविश्वासानं म्हणाला. पण तसं झालं नाही. त्याचा अंदाज चुकला आणि कार पाण्यावर तरंगू लागली. आमची कार पाण्यात अडकली. तिचं इंजिन बंद पडलं. दरवाजे आपोआप लॉक झाले. आम्ही ते उघडण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याची पातळी वाढली होती. थोड्याच वेळात आमची कार तरंगू लागली, असं संदीप पोलिसांना सांगितलं.

‘चालकानं त्याच्या शेजारी असलेल्या खिडकीची काच हातानं फोडली. त्यानं मदतीसाठी आरडाओरडा केला. मीदेखील कारमधून बाहेर पडलो. कारमध्ये अडकलेल्या इतर पाच जणांना बाहेर काढलं. पण माझी बहीण रेखा बेशुद्ध पडली. आम्ही तिला रिक्षानं सेंट मार्था रुग्णालयात नेलं. मात्र तिथल्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं,’ अशा शब्दांत संदीपनं घटनाक्रम कथन केला.
मी तुला जुगारात हरलोय, तू माझ्या मित्राच्या घरी जा! महिलेसोबत रात्री घडला धक्कादायक प्रकार
संदीपनं कार चालक आणि बंगळुरु महापालिका प्रशासनाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. इन्फोसिसमध्ये कार्यरत असलेली बतुला भानुरेखा सुट्टीवर होती. कुटुंबासोबत फिरण्यासाठी तिनं सुट्टी घेतली होती. भानुरेखासोबत वेळ घालवता यावा यासाठी त्यांनी कार भाड्यानं घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here