नोएडा : लहान मुलांसोबत विचित्र अपघात झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. अशीच एक हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशच्या ग्रेटन नोएडा इथं समोर आला आहे. इथे एका ४ वर्षाच्या निष्पाप मुलाचा त्याच्या पालकांसमोरच तडफडून मृत्यू झाला आहे. खरंतर, टॉफी खात असताना ते मुलाच्या घशात अडकलं. त्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. यानंतर जे घडलं त्याने संपूर्म परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ४ वर्षाचा चिमुरडा चॉकलेट खात असताना ती टॉफी त्याच्या घशामध्ये अडकली. यानंतर त्याला श्वसनाचा त्रास होण्यास सुरुवात झाली. आई-वडिलांनी हे पाहताच मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तो श्वासासाठी चक्क तडफडत होता. पण अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली आणि त्याचा मृत्यू झाला.

Vande Bharat : मुंबईकरांना वंदे भारत गिफ्ट, लोकल लवकरच होणार इतिहासजमा, वाचा काय आहे प्लॅनिंग
सानियाल असं या ४ वर्षांच्या मुलाचं नाव आहे. रविवारी त्याने आजोबांकडून टॉफी घेण्यासाठी हट्ट केला. म्हणून आजोबांनी त्याला पैसेही दिले. पैसे घेऊन सानियालने जवळच्या दुकानात जाऊन स्वतःसाठी टॉफी विकत घेतली. पण तो जी टॉफी खाण्याचा हट्ट करत होता त्याच टॉफीने त्याचा जीव घेतला. घरात तो एकूलता असल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

तारीख ठरली! मुंबईला मिळणार देशातला सगळ्यात मोठा समुद्री सेतू, फक्त ९० मिनिटांत पुण्यात टच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here