वाचा:
नागरिकांनी वा अन्यत्र मूर्तीसाठी गर्दी करू नये यासाठी मनसेच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना मोफत इकोफ्रेण्डली बाप्पा देण्याची तयारी सुरू केली असून यासाठी २५ हजार बाप्पांच्या मूर्ती आणण्यात आल्याचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून शेकडो कुटुंबांना जगणे मुश्किल झाले असताना बाप्पाची मूर्ती आणायला लागणारा खर्च करायलाही उसनवारी करावी लागणार होती. ही बाब ध्यानात घेऊन मनसेने पुढाकार घेत शहरातील सर्व कुटुंबाना मोफत इकोफ्रेण्डली बाप्पा घरपोच देण्याचा निर्णय घेतला. यासाठी मनसेकडून नंबर देण्यात आले असून नागरिकांनी यावर फोन करून आपला पत्ता सांगितल्यानंतर मनसैनिक बाप्पाची मूर्ती नागरिकांना घरपोच देणार आहेत. यामुळे नागरिकांचा करोनाचा धोकाही कमी होणार असून आर्थिक अडचणीच्या काळात गणेशमूर्तीसाठी लागणारा खर्चही वाचणार आहे.
वाचा:
दरम्यान, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रुग्णसंख्या रोज नवे उच्चांक गाठत आहे. अशा स्थितीत यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन आधीच राज्य सरकारने केलेलेआहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मुंबईत ‘लालबागचा राजा’सह अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करता आरोग्य उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. काही ठिकाणी गावकऱ्यांनी घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता संपूर्ण गावाचा एकच गणपती असेल, असा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी शुक्रवारीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक गणेश विसर्जन यंदा नको, असे आवाहन केले आहे. सगळेच आपापल्या परीने गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करत असताना पंढरपुरात मनसे राबवत असलेला उपक्रम या साथीच्या संकटात अभिनव असा संदेश देणारा ठरला आहे. इकोफ्रेण्डली गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे जतन होईल आणि घरपोच गणेशमूर्ती मिळत असल्याने गर्दी टळेल, असा दुहेरी उद्देश या उपक्रमातून साध्य होणार आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times