अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून राबत असलेल्या वेगवेगळ्या शेतमजुरांची ६५ मुले पोलिसांत भरती झाली आहेत. पोलिस अंमलदार म्हणून का होईना शेत सोडून बाहेरची नोकरी या मुलांना मिळाली, याचे त्यांना समाधान आहे. या सर्व उमेदवारांना एकत्र करून अग्नीपंख फौंडेशन कौटिल्य अ‍ॅकॅडमीने त्यांचा गौरव केला.पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक गणेश कुदळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी त्या विद्यार्थ्यांचे शेतमजूर पालकही उपस्थित होते.

Manish Sisodia News: मनीष सिसोदियांना कोर्टात हजर करताना काय घडलं? केजरीवालांना का आला राग?
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले म्हणाले, पोलिस झालेली बहुतेक मुल गरीब कष्टकरी परिवारातील आहेत. आता त्यांना नोकरी मिळाली आहे. पुढे पोलिस उपनिरीक्षक ते पोलिस उपअधीक्षक होण्यासाठी त्यांना संधी आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत.’

गणेश कुदळे म्हणाले, ‘मी भारतीय सैन्यात जवान होतो. सेवानिवृत्त झालो आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करून राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. असेच प्रयत्न या उमेदवारांनीही सुरू ठेवावेत.’

Crime News: पोलीस हवालदाराने ब्यूटी पार्लरमध्ये घुसून वधूवर गोळी झाडली, कारण वाचून व्हाल हैराण
छत्रपती शिवाजी महाराज खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे म्हणाले, सैन्य दल पोलिस सेवेत गरीब कुटुंबातील मुले असतात. आई वडीलांनी केलेल्या कष्टाची जाण सेवा करताना आई वडिलांना विसरु नये.

यावेळी उपनगराध्यक्षा ज्योती खेडेकर एस पी कोंथबिरे प्रशांत गोरे आदेश नागवडे मोहिनी कोंथबिरे, संतोष धुमाळ, शीतल धुमाळ, सुदर्शन राम फुले नितीन जमदाडे, विशाल चव्हाण, शुभांगी लगड उपस्थित होते.
मुंबईत रेड लाइट एरिया कुठे आहे?; रिक्षाचालकाला विचारताच यूपीतील जोडपे गजाआड, वाचले १८ वर्षीय मुलीचे आयु्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here