नवी दिल्ली : मुकेश अंबानी त्यांच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म JioMart चा नफा मोठ्या प्रमाणात वाढवण्याच्या तयारीमध्ये आहेत. यामुळे आगामी काळात अंबानी यासंबंधी महत्त्वाची पाऊलं उचलू शकतात. पण याचा थेट परिणाम JioMart च्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्सला आपला नफा वाढवायचा आहे. त्यामुळे जिओमार्टने आपल्या १ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना पिंक स्लिप जारी केली आहे. पण यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होती की, लोकांच्या नोकऱ्या हिसकावून घेणाऱ्या मुकेश अंबानींकडे पैशांची इतकी कमतरता कशी आली.JioMart च्या कर्मचाऱ्यांनी पिंक स्लिप जारी करण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या मते घाऊक विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करत आहेत. यामुळे कंपनीला घाऊक विभागातील तब्बल १५ हजार कामगारांची संख्या दोन तृतीयांश कमी करायची आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यासाठी कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसमधील ५०० अधिकाऱ्यांसह इतर एक हजार अधिकाऱ्यांना राजीनामे देण्यासाठी सांगितलं आहे. अहवालानुसार, कंपनीचे अनेक कर्मचारी परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन म्हणजेच पीआयपीवर आहेत.

अदानींच्या शेअर्सचा धमाका! या गुंतवणूकदाराने १०० दिवसात कमावले ७६८३ कोटी रुपये, पाहा कोण आहे

मेट्रो कॅश अँड कॅरी ताब्यात घेण्यात आली

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने हल्लीच अन्न घाऊक विक्रेते मेट्रो कॅश अँड कॅरीचे अधिग्रहण केले आहे. त्यानंतर त्याचं रिस्ट्रक्चरिंग करण्यात आलं. या अधिग्रहणानंतर कंपनीने तब्बल ३,५०० कर्मचारी कामाच्या ठिकाणी जोडले होते. पण यामुळे ओव्हरलॅपिंग वाढलं. अशात मार्केटमध्ये किंमतींवरून युद्ध सुरू करणारी कंपनी जिओमार्ट आता मार्जिन सुधारण्याच्या आणि तोटा कमी करण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहेत.

किंमतींच्या मार्जिन सुधारणेवर फोकस

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, JioMart मार्जिन सुधारण्यावर आणि कंपनीचा तोटा कमी करण्यावर अधिक भर देत आहे. यामुळे कंपनी त्यांच्या १५० हून अधिक केंद्रापैंकी निम्म्याहून अधिक दुकानं बंद करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे मुकेश अंबानीला पैशांची अशी काय कमतरता पडली की त्यांना थेट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आणि दुकानं बंद करण्याची वेळ आली आहे.

Rs 2000 Withdrawn: दोन हजारच्या नोटा कॅश देऊन लोक खरेदी करत आहेत ही गोष्ट; सरकार झाले अलर्ट, नियमात केला बदल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here