बुलढाणा : जिल्ह्यातील मुंबई नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस ट्रकचा अपघात झाला होता. या अपघाता ६ जणांचा मृत्यू झाला तर २६ जण जखमी होते. जखमींना उपचारासाठी जालन्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची दखल घेत शोक व्यक्त केला आहे. सिंदखेड राजा येथील पळसखेडी चक्का गावाजवळ हा अपघात झाला होता. त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

सिंदखेडराजा येथील पळसखेडी चक्का गावाजवळ आज सकाळी पुणे ते मेहकर एसटी बस आणि कंटेनर ट्रकच्या झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये तत्काळ द्यावेत तसेच जखमी प्रवाशांना योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या अपघाताविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाकडून माहिती घेतली तसेच प्रशासनाने प्रवाशांना व त्यांच्या नातेवाइकांना मदत करण्याचे निर्देश दिले.

लेकीच्या लग्नात पित्यानं जे केलं त्यानं कौतुकाचा वर्षाव, शेतकऱ्यांशी इमान राखलं,विवाह सोहळ्याची सगळीकडे चर्चा

जखमींवर जालन्यात उपचार सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर आगाराच्या बसला (क्रमांक MH ४० Y ५८०२) पुण्याहून मेहकरला येताना सकाळी सहा वाजे दरम्यान सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का जवळ अपघात झाला. एसटी बस आणि ट्रकची (क्रमांक OD ११ S १६५७) जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात बसचा चालक राजू तुकाराम कुलाल (वय – ४२, वडगाव तेजन, ता. लोणार जि. बुलढाणा), शेषराव उत्तमराव खराबे (वय – ६५, – अंत्री देशमुख, ता. मेहकर जि. बुलढाणा), गोकर्णा रामदास खिल्लारे (वय ५५, केळवद, ता. – चिखली जि. बुलढाणा), वनमाला किशोर पवार ( वय ३०, बेलगाव, ता. मेहकर जि. बुलढाणा), सीमा सोमेश्वर जोशी (वय ४५, मेहकर जि. बुलढाणा) आणि कंटेनर चालक हे ठार झाले तर २६ प्रवासी जखमी झाले.

GT vs CSK Live Score: चेन्नईने घरच्या मैदानावर गुजरात दिले चॅलेंज; हार्दिक समोर आव्हानात्मक टार्गेट
प्रभाकर मुंढे (दुसरबीड), अखिलेश ढाकरके (मेहकर), प्रल्हाद देशमुख (दुसरबीड), लीलाबाई माने (मेहकर), अगस्त माने (मेहकर), शितल माने (मेहकर), लीलाबाई अग्रवाल (मेहकर), सै. बीबन सै. बु-हान (सिंदखेडराजा), वैष्णवी वाघ, ओम वाघ ( दुसरबीड), राहुल मोरे (अंजनी), योगेश जुमडे (दुसरबीड), जीवन डेरे (राजेगाव), अर्चना ढाकरके (मेहकर), विकास व्यवहारे (मेहकर), हर्षदा पाटोळे (लोणार), सुनील वाघ (दुसरबीड), सुनिता लव्हाळे (लव्हाळा), मंजुषा शिरके (पुणे), वत्सला चव्हाण ( कारेगाव), जया पाटोळे, श्वेता पाटोळे, सार्थक पाटोळे (मेहकर), विलास दुबे (हजारी बाग), गायत्री तहकीत (मेहकर), रूखमीना वाघ (सिंदखेडराजा) अशी जखमींची नावे असल्याची माहिती समोर येत आहे.

हार्दिकचा मास्टरस्ट्रोक! पाणी आणणाऱ्या महाराष्ट्राच्या दर्शन नळकांडेला खेळवलं व ठरला हिरो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here