चेन्नई: आयपीएल २०२३च्या पहिल्या क्वॉलिफायर मॅचमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने ७ बाद ००० धावा केल्या. चेन्नईला सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून दिली. ऋतुराज गायकवाडने ६० तर कॉन्वेने ४० धावा केल्या. मात्र मधळ्या फळीतील फलंदाजांना फार प्रभाव टाकता आला नाही.गायकवाड आणि कॉन्वे जोडीने पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागिदारी केली. त्यानंतर शिवम दुबे १, अजिंक्य रहाणे १७, कॉन्वे ४० आणि रायडू १७ धावा करून माघारी परतले. रायडूच्या रुपाने १८व्या षटकात चेन्नईने पाचवी विकेट गमावली आणि मैदानात एकच जल्लोष सुरू झाला. कारण रायडू बाद झाल्याने त्याच्या जागी कर्णधार महेंद्र सिंह धोनी मैदानात येणार होता. धोनी मैदानावर येत असताना चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

आज तू तेवढा खेळू नको, आम्हाला मॅच जिंकायची आहे; चेन्नईच्या खेळाडूंनी या फलंदाजासमोर हात जोडले
आयपीएलच्या या हंगामात धोनीची ही चेपॉकवरील अखेरची मॅच आहे. धोनी पुढील हंगाम खेळणार की नाही हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे या अखेरच्या लढतीत तो काही तरी कमाल करेल असे वाटले होते. चाहत्यांना देखील धोनीकडून काही चौकार, षटकारांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. १९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोहित शर्मा त्याला फक्त १ वर बाद केले.

गुजरात टायटन्स थेट फायनलमध्ये जाणार; घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जसमोर अडचणींचा डोंगर उभा


CSK vs GT : पावसामुळे मॅच झाली नाही तर कोण होणार विजेता; क्वॉलिफायर, एलिमिनेटरचे नियम असे आहेत

धोनी बाद झाला आणि मैदानावर स्मशान शांतता पसरली. चाहत्यांना विश्वासच बसला नाही धोनी बाद झालाय. धोनी मैदानावर आल्यापासून संपूर्ण स्टेडियममध्ये एकच जल्लोष होता तो अचानक गायब झाला. धोनीची चेपॉकवर ही अखेरची मॅच ठरले का हे कळण्यासाठी काही काळ जावा लागेल. पण तसे झाले तर घरच्या मैदानावरील अखेरच्या लढतीत धोनीला मोठी धावसंख्या करता आली नाही याचे दुख: चाहत्यांना नक्कीच वाटेल.

चेन्नई सुपर किंग्जने आज विजय मिळवला नाही तर त्यांना फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. क्वॉलिफायर दोनमध्ये त्यांची लढत लखनौ सुपर जायंटस आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील विजेत्या संघाशी होणार होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here