नवी दिल्ली : तुमचा नवरा ज्या बँकेत काम करतो, त्या बँकेतून जर तुमच्याही खात्यामध्ये पगार आला तर तुम्हाला काय वाटेल. विचार करायला किती आनंद झाला ना. आता तुम्ही म्हणाल असं काही होणार नाही. पण ही बातमी खरी आहे. तुमचा नवरा ऑफिसमध्ये काम करेल आणि घरी बसून तुमच्याही खात्यामध्ये पगार येईल. या कंपनीने अशी सुरुवात केली आहे की ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. कंपनीने कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या पत्नींना पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचाऱ्यांच्या पत्नींना भेटवस्तू

या कंपनीने ही कल्पना सादर करताच याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे कंपनीच्या बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना ३० कोटी रुपयांची भेट दिली आहे. UAE मधील शारजाह इथं राहणाऱ्या सोहन रॉय या भारतीय व्यावसायिकाने हा एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे. २०२१ मध्ये त्यांनी याबद्दल विचार केला होता. अखेर ते आता पूर्ण होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पत्नींनाही पगार देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी गृहिणी आहेत किंवा कोणतंही काम करत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे.

मुंकशे अंबानींना पैशांची अशी काय कमतरता भासली की उचलणार मोठं पाऊल, कर्मचार्‍यांमध्ये गोंधळ
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगार किती दिला जाईल, याचंही सूत्र तयार करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारातील २५ टक्के रक्कम ही त्यांच्या पत्नींना देण्यात येणार आहे. कंपनीत ३ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. कंपनीचे सीईओ सोहन रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती कंपनीमध्ये जे काही कमावेल त्यातील २५ टक्के हिस्सा हा त्यांच्या पत्नींकडे दिला जाईल. करोनाच्या महामारीमध्येही कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या पत्नींनाही पगार देण्याचा निर्णय घेतला होता. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, कंपनी व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या पत्नींचाही डेटाबेस तयार केला आहे, ज्या नोकरी करत नाही. अशा गृहिणींना कंपनी पगार देणार आहे.

कंपनीकडून कर्मचाऱ्यांना तब्बल ३० कोटींची भेट…

एरीज ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ सोहन रॉय यांच्या कंपनीने २५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे कंपनीने या अनोख्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलं आहे. कंपनीने ‘रौप्य महोत्सवी भेट’ म्हणून ३० कोटी रोख तसेच कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे. इतकंच नाहीतर कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी म्हणजे आई-वडील, पत्नी आणि मुलांसाठी विशेष भेटवस्तू जाहीर करण्यात आल्या आहेत.

अदानींच्या शेअर्सचा धमाका! या गुंतवणूकदाराने १०० दिवसात कमावले ७६८३ कोटी रुपये, पाहा कोण आहे

कोण आहेत सोहन रॉय…

सोहन रॉय हे Aries ग्रुप ऑफ कंपनीजचे CEO आहेत. मुळात भारतीय सोहन रॉय यांच्या कंपनीचे मुख्यालय UAE मध्ये आहे. एकेकाळी मरीन इंजिनिअर असलेल्या सोहन रॉय यांनी ही कंपनी सुरू केली. ११९९८ ध्ये त्यांनी सागरी आणि अभियांत्रिकी सेवा सुरू केली होती. व्यवसायासोबतच ते सिनेसृष्टीसोबतदेखील जोडलेले आहेत. त्यांच्या कंपनीत २२०० हून अधिक कर्मचारी काम करत असून त्यांचा व्यवसाय २५ देशांमध्ये विस्तारलेला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here