तसे पाहता गुजरातला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे. गुजरातचा सामना २६ मे रोजी लखनौ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील एलिमिनेटरच्या विजेत्याशी होईल. विजेता संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे.
शेवटच्या षटकात लागला निकाल
सामन्याच्या २०व्या म्हणजेच अंतिम षटकात गुजरातला विजयासाठी २७ धावांची गरज होती. धोकादायक दिसणारा राशिद खान १९व्या षटकात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. गुजरातकडून फॉर्मात असलेल्या शुभमन गिलने ३८ चेंडूत सर्वाधिक ४२ धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहर, महिष टीक्षाना आणि रवींद्र जडेजाने २-२ बळी घेतले. १४व्या षटकात धोनीची दीपक चहरची गोलंदाजी आणि स्लो कटरमध्ये शुभमन गिलची शिकार हे सामन्याचे टर्निंग पॉइंट ठरले. गुजरात टायटन्सने १३ षटकात ८८ धावा केल्या होत्या. संघाला ४२ चेंडूत ८५ धावा हव्या होत्या.
चेन्नईसाठी गायकवाड हिरो
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने सलामीवीर रुतुराज गायकवाडच्या (४४ चेंडूत ६० धावा, चार चौकार, एक षटकार) याच्या जोरावर सात गडी बाद १७२ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे (३४ चेंडूत ४० धावा) सोबत पहिल्या विकेटसाठी दोघांनी ६४ चेंडूत ८७ धावांची भागीदारी केली. अजिंक्य रहाणे (१० चेंडूत १७ धावा), अंबाती रायडू (९ चेंडूत १७ धावा) यांनी मधल्या षटकांमध्ये निराशा केली.
शेवटी, रवींद्र जडेजाने १६ चेंडूत २२ धावा करून फिनिश केले. महेंद्रसिंग धोनीकडून षटकारांची अपेक्षा करणाऱ्या चाहत्यांची मात्र निराशा झाली. एक धाव काढून तो मोहितचा दुसरा बळी ठरला. गुजरात टायटन्सतर्फे मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी दोन तर दर्शन नळकांडे, रशीद खान आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.