जिल्ह्यातील तीन प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. ( )
वाचा:
बल्लारपूर, गोंडपिंपरी व घुग्घुस ही चंद्रपुरातील तीन प्रमुख शहर असून या शहरांत मोठ्या प्रमाणात बाधिताची संख्या वाढत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुस ग्रामपंचायत हद्दीत रविवार १६ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते २० ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व किराणा दुकानं, सर्व किरकोळ व घाऊक विक्रेते व इतर व्यवसाय करणारी दुकाने व अन्य आस्थापना पूर्णपणे बंद राहतील, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
बल्लारपूर शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या शंभराच्या वर पोहचली आहे. त्यामुळे सोमवार १७ ऑगस्ट पहाटेपासून २१ तारखेपर्यंत बल्लारपूर -बामणी बंद राहणार आहे. गोंडपिंपरी शहरात करोनाने शिरकाव केला असून खबरदारी म्हणून १६ ऑगस्टपासून २२ तारखेपर्यंत या शहरात लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. गोंडपिंपरी शहरात २१ व २२ तारखेला फक्त जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात म्हणून नऊ ते दुपारी दोन या कालावधीत दुकाने सुरू असतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
वाचा:
जिल्ह्यातील रुग्णसंख्या पोहचली १ हजार ७० वर
चंद्रपूर जिल्ह्यात १४ ऑगस्टच्या रात्री ६५ वर्षीय करोना बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला बल्लारपूर येथील गोकुळनगर भागातील असून करोनामुळे झालेला जिल्ह्यातील हा आठवा मृत्यू ठरला आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांची एकूण संख्या १ हजार ७० वर पोहचली आहे. यापैकी करोनातून ६७० बाधित बरे झाले आहेत तर सध्या ३९० बाधितांवर उपचार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी बाधितांची संख्या १ हजार २७ इतकी होती. ती शनिवारी सायंकाळपर्यंत १ हजार ७० वर पोहचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे एकूण १० मृत्यू झाले असून त्यात जिल्ह्यातील ८ जणांचा तर जिल्ह्याबाहेरील दोघांचा समावेश आहे. करोना बाधित रुग्णांचा वाढता आकडा हा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेपुढील चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच खबरदारीची पावले टाकण्यात येत आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times