सिंधुदुर्गः विजयदुर्ग किल्ल्याला गत वैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करू, असं आश्वासन पालकमंत्री यांनी दिलं. पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी विजयदुर्ग किल्ल्याची पहाणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर हे उपस्थीत होते.

विजयदुर्ग किल्ल्याचे संपूर्ण बजेट तयार करणार येईल. किल्ल्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाशीही चर्चा करण्यात येईल. गरज भासल्यास किल्ल्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देऊ. येत्या वर्ष भरात किल्ल्याचे काम सुरू होईल. विजयदुर्ग ग्रामपंचायतीची नवीन इमारत उभारण्यासाठी ही निधी देण्यात येईल. त्यासाठी ग्रामपंचायतने जागेचा प्रश्न मार्गी लावावा. विजयदुर्ग विकासासाठी आराखडा तयार करणार आसल्याचंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.

तांबळडेग बंधारा दुरुस्ती करण्यास मंजुरी

तांबळडेग येथील वाहून गेलेला बंधारा दुरुस्त करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसंच या ठिकाणी १ किलोमीटर लांबीचा बंधारा बांधण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. तांबळडेग येथील धुप प्रतिबंध बंधाऱ्याची पाहाणी सामंत यांनी केली. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या.

नवीन धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी तातडीने खर्चाचा आराखडा सादर करावा. एक किलोमीटर लांबीचा बंधारा हा ५ गावांसाठी आहे. त्यामुळे त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देऊ. स्थानिकांची अडचण होऊ नये यासाठी तत्पूर्ती दुरुस्ती करण्यात यावी, असं सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here