मुंबई: हिंदी सिनेसृष्टी आणि मालिकेतले लोकप्रिय अभिनेते नितिश पांडे यांचं निधन झालं आहे. ‘अनुपमा’ मालिकेत रुपाली गांगुली हिच्या मैत्रिणीच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या नितिश पांडे यांनी २३ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. नितिश याचं हॉर्ट अटॅकनं निधन झाल्याची माहिती आहे.
पुन्हा प्रेमात पडायचं आहे, पण…सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजला सतावतेय ही भीती
नितिश पांडे यांच्या आकस्मित निधनाने त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लेखक सिद्धार्थ नागर यांनी नितेश यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.त्यांनी पोस्ट शेअर करत नितेश यांच्या निधनाबद्दल सांगितलं. ‘हे खरं आहे, मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथून परत येताना मला नितेश यांच्या निधनाबद्दल समजलं. त्यांनी सांगितलं की, नितेश शुटिंगसाठी मुंबईबाहेर गेले होते. तिथं त्यांना रात्री १: ३०च्या दरम्यान कार्डियक अरेस्ट आला’, असं त्यांनी सांगितलं.

नितेश पांडे यांचा जन्म १७ जानेवारी १९७३ रोजी झाला. त्यांनी गेली अनेक वर्षे चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं. टीव्हीवरचा एक लोकप्रिय चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं. शाहरुख खानच्या ‘ओम शांति ओम’ चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ते शाहरुखच्या असिस्टंटच्या भूमिकेत होते. तसंच दिशा परमार आणि नकुल मेहता यांच्या ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार’ या गाजलेल्या मालिकेतूनही ते महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
तुम्ही महाराष्ट्रात जन्मलात, वाढलात; मग…मराठी भाषेबद्दल अदा असं काय म्हणाली? सगळेच करतायत कौतुक
१९९५ मध्ये नितेश यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘तेजस’, ‘साया’, ‘मंजिलें अपनी अपनी’, ‘जुस्तजू’, ‘हम लड़कियां’, ‘सुनैना’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘एक रिश्ता साझेदारी का’, ‘महाराजा की जय हो’, ‘हीरो-गायब मोड ऑन’ या मालिकांमध्ये काम केलं. तसंच सध्या ते ‘अनुपमा’ मालिकेत धीरज कपूर या भूमिकेत दिसत होते. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळत होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here