जम्मू : जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. रस्त्यावरुन वाहन घसरुन दरीत कोसळलं, या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटना दच्चन भागातील डांगदुरु वीज योजनेच्या जवळ सकाळी ८.३५ वाजण्याच्या सुमारास घडली. मदतकार्य सुरु करण्यात आलं असून या प्रकरणी अधिक माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. अपघातातील जखमींना मदत करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. डांगुरु योजनेजवळील दुर्घटनेसंदर्भात किश्तवाडचे जिल्हाधिकारी डॉ. देवांश यादव यांच्याशी चर्चा केल्याचं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून एक जणाचा मृत्यू झाला आहे.

नदीत आंघोळ करताना पाण्याचा अंदाज चुकला, आईच्या डोळ्यादेखत लेकरु बुडालं

धोनीने ५ मिनिटे सामना थांबवला, अंपायरसोबत ‘त्याच्यासाठी’ भिडला आणि चेन्नईचा विजय झाला पक्का!
जितेंद्र सिंह याांनी सर्व जखमींना आवश्यकतेनुसार किश्तवाडच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. किश्तवाडमधील डोडो येथील जीएमसी रुग्णालयात जखमीवर उपचार करण्यात येत होते. गरजेनुसार त्यांना मदत केली होती, असं ते म्हणाले. प्राथमिक माहितीनुसार अपघातातील मृतांमध्ये मजुरांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

बातमी अपडेट होत आहे…
मालिका विश्व शोकसागरात! अभिनेते नितेश पांडे याचं निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here