शशिकांत नरवडे यांचे वडील एसटीत ड्रायव्हर होते. केवळ दीड एकर जमीन पदरात पण मुले शिकली पाहिजे हे ध्येय दतात्रय नरवडे यांचे होते. एसटी चा पगार तुटपुंजा असल्यानं दत्तात्रय यांना पत्नी सुनंदा यांचा आधार मिळाला. शशिकांतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मसला येथे झाले. इयत्ता ५ वी पासून वैराग येथील तुळसीदास जाधव हायस्कूल त्यानं येथे झाले. दतात्रय यांचा पगार तुटपुंजा असल्यामुळे सुनंदा यांनी कोंबडी पालन, शेळी पालन केले. नरवडे दाम्पत्यानं उत्पन्नातून दोन्ही मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी हातभार लावला.पुढे मोठा मुलगा श्रीराम याच्या शिक्षणासाठी लातुर गाठले. शशिकांत याला सरस्वती हायस्कुल येथे शिकायला ठेवलं होतं. दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागावा म्हणुन सुनंदा घरखर्चात काटकसर केली. दत्तात्रय नरवडे यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्टेट बँकेनं कर्ज दिलं होतं.
शशिकांत नरवडे यांचे स्वप्न आपण अधिकारी व्हावे असे होते.वालचंद इंजिनिआरिंग काँलेजला बी. टेक केल्यानंतर २०१६ मध्ये त्यानं पुणे येथे यूपीएससीसाठी अभ्यासिका लावली २०२१ पर्यंत पुणे येथे अभ्यास केला.२०२१ मध्ये त्यानं दिल्ली गाठली. यूपीएससी पास होण्यासाठी यासाठी सारथी पुणे यांनी शशिकांतच्या शैक्षणिक खर्चासाठी हातभार लावला.१ वर्षाचा खर्च सारथीने दिला. सलग ५ वेळा शशिकांत अपयशी ठरला होता ६ व्या प्रयत्नात शशिकांत यशस्वी झाला.सलग १५ तास केलेला अभ्यास आणि जिद्द यामुळेच शशिकांत यामुळे यशस्वी झालाय.