सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : दोन दिवसांपूर्वी तेलंगणा येथे काकांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून सुरतकडे जाणाऱ्या भावंडांवर काळाने घाला घातला. चारचाकी कार चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला. यात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले. ही घटना बुधवार दि.२४ रोजी पहाटे तीन वाजता समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे करमाड- शेकटा गावाजवळ घडली.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, संजय राजणभाई गौड वय ४३, कृष्णा राजणभाई गौड वय ४४, श्रीनिवास रामू गौड वय ३८, सुरेशभाई गौड वय ४१ (सर्व रा. लेफ सिटी करडवा, सुरत, गुजरात) असे अपघातात मयत झालेल्या चौघा चुलत भावंडांची नावे आहेत.

विलासच्या पहिल्या बायकोचं भूत आलं न् खून केला, विदर्भाला चक्रावणाऱ्या हत्येचं गूढ उकललं
गौड कुटुंबीय सुरत येथे कपड्याचा व्यवसाय करतात. गौड कुटुंबातील एका वयोवृद्ध व्यक्तीचा तेलंगणा येथे मृत्यू झाला होता. काकांच्या अंत्यविधीसाठी चारही भावंडं अर्टिगा या चारचाकी वाहनाने गेले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून चारही भावंडं घवू सुरतकडे निघाले होते.

पतीनिधनानंतर दुसरा आधारही हरपला, १८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खंबीर मातेचा आदर्श निर्णय
दरम्यान करमाड – शेकटा येथील समृद्धी महामार्गावर गौड कुटुंबियांच्या वाहन चालकांचे नियंत्रण सुटले. डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी भरधाव वेगात असलेली चारचाकी दुभाजकावर धडकली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याने अखेरचा श्वास घेतला. गाडीत मागे बसलेला मुलगा अपघातातून बचावला आहे. दरम्यान या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बस अर्ध्यापर्यंत कापली गेली, बुलढाणा अपघातात ६ जणांनी गमावले प्राण

या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Pune Crime : पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, आजारपणातून टोकाचं पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here