मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दोन हजार रुपयाची नोट चालनातू काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत ज्या लोकांकडे या गुलाबी नोटा आहेत, त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत बदलून किंवा खात्या जमा करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी बँकिंग सेवा कालपासून म्हणजेच २३ मे २०२३ पासून सुरू झाली असून आता लोंकांना आपल्या २,००० रुपयांच्या नोटा घेऊन बँकांमध्ये फेऱ्या माराव्या लागणार आहेत.

काही बँक शाखांमध्ये मंगळवारी२,००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी लहान रांगा दिसल्या.जेव्हा काल सकाळीबँक शाखा उघडल्यातेव्हा नोटा जमा किंवा बदलण्यासाठी कोणतीही विशेष गर्दी दिसली नाही.महानगरांमधीलखाजगी क्षेत्रातील बँकांच्या शाखांमध्ये सामान्यपणे व्यवहार होत होते. या दरम्यान, आणखी एक मोठी बातमी समोर आलीकी, पोस्ट ऑफिसमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेता येणार नाहीत. म्हणजेच नोटा बदलण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल.

Rs 2000 Withdrawn: दोन हजारच्या नोटा कॅश देऊन लोक खरेदी करत आहेत ही गोष्ट; सरकार झाले अलर्ट, नियमात केला बदल
पोस्ट ऑफिसमध्ये २००० नोटा बदलून मिळणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०००रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधाफक्त बँकांमध्ये उपलब्ध असेल आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनती बदलता येणार नाही. मात्र, ग्राहक २००० रुपयांच्या नोटा पोस्टऑफिसमध्ये जमा करूशकतात कारण या नोटा अद्याप कायदेशीर निविदा आहेत. पोस्ट ऑफिसात नोटा जमा करण्यासाठी तुम्हाला एक व्हाउचर भरावे लागेल.

रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात शुक्रवारी२,०००रुपयांच्या नोटा चलनातूनबाहेरकाढण्याची घोषणा केली आणि सांगितले की २००० रुपयांच्या नोटा असलेले २३ मे पासून नोटा बँकांमध्येबदलू किंवा जमा करू शकतात. परंतु आरबीआयने म्हटले की ३० सप्टेंबरनंतरही २००० रुपयांच्या नोटा कायदेशीरनिविदा म्हणून कायम राहतील. यासोबतच रिझर्व्ह बँकेने बँकांना २०००रुपयांच्या नोटा जारी करण्यासही मनाई केली आहे. या नोटा चार महिने किंवा पुढील आदेश येईलपर्यंत वैध असल्याने तुम्ही त्या जमा करु शकता.

2000 Rupees Exchange: आजपासून २००० रुपयाची पाठवणी! घरबसल्याही बदला नोटा, पण कसं? जाणून घ्या
आरबीआयचे बँकांना निर्देश
दरम्यान, रिझव्‍‌र्ह बँकेने बँकांना २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा खात्यात जमा करण्यासाठी आलेल्या लोकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ‘शेड्स’ची व्यवस्था करण्यास सांगितले असून रांगेतील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात यावी, असे सांगितले. उल्लेखनीय आहे की २०१६ मध्ये मोठ्या नोटाबंदीच्या काळात नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या आणि या काळात अनेक ग्राहकांचा मृत्यूही झाल्या होत्या.

2000 Note Exchange Guidelines: २४ ठीक, पण २५व्या नोटेसाठी पॅन-आधार कार्ड सक्तीचं, जाणून घ्या काय आहे नियम
२००० रुपयांच्या नोटांचा वापर
दरम्यान, तुम्ही पोस्ट ऑफिसमधील सेवांचा लाभ घेण्यासाठी किंवा स्टॅम्प आणि इतर खरेदी करून २००० रुपयांच्या नोटा खपवू शकतात. तसेच तुम्ही रजिस्ट्री किंवा स्पीड पोस्टासाठी या नोटांचा वापर करु शकता आणि २००० रुपयांच्या नोटा देऊन तुम्ही मनीऑर्डर पण करु शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here