मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीला अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीचा मोठा फायदा झाला आहे. अदानी समूहातील एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य ६२०० कोटी रुपयांनी वाढले आणि २३ मे २०२३ रोजी ते ४५,४८० कोटी रुपयांच्या पुढे गेले.

एलआयसीला मोठा तोटा
अदानी समूहाविरुद्ध हिंडेनबर्ग संशोधन अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासून एलआयसीला अदानी समूहाच्या शेअर्समधील गुंतवणुकीवर मोठा तोटा होत आहे. परंतु मार्च महिन्यात जीक्यूजी पार्टनर्सच्या गुंतवणुकीमुळे आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या अहवालामुळे समूहाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे एलआयसीला त्यांच्या गुंतवणुकीवर मोठा नफा मिळत आहे.

फक्त २४ तास अन् डाव उलटला! गौतम अदानींचा दिग्गजांना धोबीपछाड, श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर
मूल्य अजूनही कमीच
एलआयसीने जानेवारी २०२३ च्या शेवटी सांगितले होते की, अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये एकूण ३०,१२७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य ३२,००० कोटी रुपयांवर आले होते. तर हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य ८२,००० कोटी रुपये होते. मात्र, एलआयसीचे होल्डिंग व्हॅल्यू अजूनही या स्तरांपेक्षा ३७,००० कोटी रुपये कमी आहे.

अदानींच्या शेअर्सचा धमाका! या गुंतवणूकदाराने १०० दिवसात कमावले ७६८३ कोटी रुपये, पाहा कोण आहे
लाख कोटींची वाढ
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा अहवाल १९ मे रोजी समोर आला आणि त्या दिवसापासून अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये समूहाच्या मार्केट कॅपमध्ये जवळपास २ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

अदानी समूहातील हिस्सा
बीएसईच्या आकडेवारीनुसार, एलआयसीचा अदानी एंटरप्रायझेसमध्ये ४.२३ टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये ३.६५ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये ५.९६ टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये १.२ टक्के हिस्सा आहे. अदानी समूहाच्या सिमेंट कंपन्यांमध्येही एलआयसीची गुंतवणूक आहे. एलआयसीचा अंबुजा सिमेंटमध्ये ६.३३ टक्के आणि एसीसीमध्ये ६.४१ टक्के हिस्सा आहे. अदानी पोर्ट्समध्ये एलआयसीची ९.१४ टक्के हिस्सेदारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here