नवी दिल्ली: भारताला आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धाचे विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या क्रिकेटमधील निवृत्तीवर सोशल मीडियावर त्याचे संघातील आजी-माजी सहकारीपासून ते सर्व सामान्य चाहते व्यक्त होत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय धोनीबद्दलच्या अनेक आठवणी शेअर करत आहेत. या सर्वात धोनीच्या एका चाहत्याची पोस्ट सोशल मीडियासह whatsappवर जोरदार व्हायरल होत आहे.

वाचा-
धोनीने आज संध्याकाळी इस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून निवृत्ती जाहीर केली. ज्या प्रमाणे धोनी मैदानावर कधी कोणता निर्णय घेईल याचा नेम नसायचा तसाच त्याचा हा देखील निर्णय होता. धोनीची कोणतीही गोष्ट नॉर्मल नव्हती. त्याची विकेट किपींग, त्याची हेअर स्टाइल, त्याचा हेलिकॉप्टर शॉट, फिटनेस, कोणत्याही परिस्थितीत डोक शांत ठेवण्याची क्षमता, डीएसआरएल घेण्याची निर्णय असो या सर्व गोष्टीत धोनी वेगळा होता.

वाचा-
आता त्याची निवृत्ती देखील नॉर्मल नव्हती. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या कभी-कभी या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांनी लिहलेले आणि मुकेश यांनी गायलेले मै पल दो पल का शायर हूँ या गाण्यासह धोने २००४ ते २०१९ पर्यंतचे सर्व क्षण एका व्हिडित टाकले आणि निवृत्ती जाहीर केली.

वाचा-
धन्यवाद, तुम्ही दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल; १९.२९ वाजल्यापासून मी निवृत्त झालो असे समजा.

वाचा धोनीच्या एका चाहत्याचा व्हायरल होणारा मेसेज…
MSD रिटायर झाला …

ह्या माणसांचं काहीच नॉर्मल नव्हतं …

आला तेव्हा विकेट किपींग ..

त्याची हेअर स्टाईल ..

त्याचा हेलिकॉप्टर शॉट ..

त्याचा फिटनेस ..

त्याचा क्रिकेटिंग सेन्स ..

त्याची डोकं शांत ठेवायची क्षमता ..

त्याचा डीआरएस रिव्ह्यू घेताना असलेला स्मार्टनेस ..

त्याचं टेम्परामेंट ..

त्याची कॅप्टन्सी ..ती करताना त्याने घेतलेले निर्णय ..

कसोटी क्रिकेटमधून रिटायर होताना अवलंबलेली पद्धत ..

आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होताना निवडलेली पद्धत ..

प्रत्येक गोष्ट Above Normal ..

इंस्टाग्राम अकाउंटवरच्या पोस्टमध्ये “मैं पल दो पल का शायर हूं ..” हे गाणं बॅकग्राउंडला वाजतंय आणि 2004 ते 2020 सगळ्या मेमरी शेअर होतायत ..खालती एकच कमेंट ” आज संध्याकाळी 19.29 पासून मला निवृत्त समजा ” असं कुणी रिटायर झालंय का आजपर्यंत ???

1 एकदिवसीय वर्ल्ड कप ..1 टी20 वर्ल्ड कप ..1 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि असंख्य कधीही न विसरता येणाऱ्या मेमरीज …

महेंद्र सिंग धोनी …थँक यू ..

(MSD चा फॅन)����������������������

हे देखील वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here