नवी मुंबईतील हजारो ऑफिस कर्मचाऱ्यांना सेवा देणाऱ्या खासगी बसेला स्पर्धा देण्यासाठी बेस्टकडून पुढील काही दिवसांत खारघर ते ब्रांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत प्रीमियम एसी बस सुरू करण्यात येणार आहे. ऑफिसला जाणाऱ्या आणि इतर प्रवाशांसाठी या विशेष बसेस सुरू केल्या जातील, या बसमुळे प्रवाशांना ऑफिसला जाताना आणि दररोज घरी परतताना या बसमधून लक्झरी, आरामदायी अनुभव घेता येईल, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी दिली.

खारघर ते बीकेसी प्रीमियम बस सेवा

खारघर ते बीकेसी प्रीमियम बस सेवा

बेस्ट प्रीमियम सर्विससाठी नव्या रुटची सुरुवात होणार आहे. नव्या बसेसमुळे सध्या असलेल्या मार्गावर फ्रिक्वेंसी वाढेल. सध्या एयरपोर्ट एक्सप्रेससाठी कधी एक तास, तर कधी ४० मिनिटांनी एक बस आहे. मात्र आता नव्या बसेस सुरू झाल्यानंतर हा कालावधी दर अर्धा तासावर येईल, असंही लोकेश चंद्रा म्हणाले.

App द्वारे काढता येणार तिकीट

app-

या बससाठी अॅपद्वारे तिकीट काढता येणार आहे. प्रवासाआधी बसमध्ये एक निश्चित सीट बुक करता येईल. या बेस्ट प्रीमियम बससाठी Chalo मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध होईल. या अॅपमधून प्रवाशाला आपली सीट बुक करावी लागेल. या बसमधून प्रवास करण्यासाठी ज्या प्रवाशांनी बुकिंग केलं आहे, त्याच प्रवाशांना बसमधून प्रवास करता येईल. या मार्गावर चालणाऱ्या बससाठी अतिशय कमी स्टॉप असतील.

प्रीमियम बसने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी खास ऑफर

प्रीमियम बसने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी खास ऑफर

प्रीमियम बसचं तिकीट सर्वसाधारण बसच्या तुलनेत अधिक असतं. पण जे प्रवास या बसने नियमित प्रवास करतील त्यांच्यासाठी खास ऑफर आहे. जर एखादा प्रवासी चौपाटी विल्सन कॉलेज ते इंटरनॅशनल एयरपोर्टपर्यंत जाण्यासाठी १५५ रुपयात सीट बुक होते. मात्र याच मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी तिकीट ११५ रुपये असेल. अशाप्रकारे सर्व मार्गावर नियमित प्रवाशांना ऑफर दिली जाणार आहे.

४० प्रीमियम बसेस जोडल्या जाणार

४० प्रीमियम बसेस जोडल्या जाणार

दरम्यान, सध्या मुंबईत बेस्टच्या ६० प्रीमियम बस आहेत. या बस ठाणे ते बीकेसी, एयरपोर्ट एक्सप्रेस, बांद्रा – बीकेसी, अंधेरी पूर्व आणि गुंदवली मेट्रो स्टेशन ते बीकेसी या मार्गावर या बसची सुविधा आहे. आता बेस्टच्या ताफ्यात आणखी ४० प्रीमियम बसेस जोडल्या जाणार आहेत. या वर्षाअखेरपर्यंत बेस्टच्या ताफ्यात २०० प्रीमियम बसेस असतील.

बसमध्ये असणार सेफ्टी फीचर

बसमध्ये असणार सेफ्टी फीचर

भविष्यात या अॅपमध्ये होम सेफ नावाचं एक फीचर दिलं जाणार आहे. हे अॅप प्रवाशांच्या सुरक्षेसंबंधीत असणार आहे. बसमध्ये चढल्यानंतर ते ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या वेळेनुसार प्रवाशाचं लोकेशन कंट्रोल रूममध्ये ट्रेस केलं जाईल. प्रवासी घरी पोहोचल्यानंतर कंट्रोल रुमकडून फीडबॅक घेतला जाईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा फीडबॅक घेतला जाणार आहे. प्रवाशाने प्रतिसाद न दिल्यास कंट्रोल रुमला कॉल केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here