म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात रेल्वेमार्गावरून जाणारे तब्बल १३ पूल धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. यंदा गणेश आगमन-विसर्जनाला मिरवणुका काढण्यास बंदी असली तरी या पुलांवर भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या १३ पुलांपैकी काही पुलांची दुरूस्ती कामे सुरू झाली असून काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहेत. गणेशभक्‍तांना व गणेश मंडळांना रेल्‍वेमार्गावरील पुलांच्‍या संभाव्‍य धोक्‍याबाबत मुंबई महापालिकेने सावध केले आहे. रेल्‍वेमार्गावरील पूल हे अतिशय जुने झाल्‍याने धोकादायक स्थितीत आहेत.

गणेशभक्‍तांनी उत्सवकाळात पूल पार करताना काळजी घ्‍यावी. पुलावरून विसर्जनाच्‍यावेळी जाताना गटागटाने जावे. पुलांवर ध्‍वनिक्षेपकाचा वापर करू नये तसेच नाचगाणी करू नयेत. पुलांवर जास्‍त वेळ न थांबता त्‍वरित पुढे जावे. पोलिस व महापालिका प्रशासन यांनी दिलेल्‍या सुचनांनुसार ये-जा ठेवावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. करी रोड आणि चिंचपोकळी रेल्वेपुलांबाबत विशेषत: काळजी घ्यावी, अशी माहिती देण्यात आली आहे.

१६ टनपेक्षा अधिक वजन नको

करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी महापालिकेने यंदा आगमन-विसर्जनाला मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे. त्यानंतरही उत्सव काळात भाविक घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुलांवर अधिक वजन पडणार नाही याची खबरदारी पालिकेने घेतली आहे. पुलांवर १६ टनपेक्षा जास्त वजन पडणार नाही. पुलावर जास्त काळ थांबून राहू नये, याची मंडळांनी विसर्जनादरम्यान काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मध्‍य रेल्‍वे

घाटकोपर पूल

करीरोड पूल

चिंचपोकळी पूल

भायखळा पूल

पश्चिम रेल्‍वे

मरीन लाइन्‍स पूल

ग्रँट रोड फेरर पूल

सँडहर्स्‍ट पूल (ग्रँट रोड व चर्नी रोडच्‍या मध्‍ये)

फ्रेंच पूल

केनडी पूल

फॉकलंड रेल पूल

बेलासिस पूल

महालक्ष्‍मी पूल

प्रभादेवी-कॅरोल पूल

लोकमान्य टिळक पूल दादर

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here