आज माजी पंतप्रधान यांची दुसरी पुण्यतिथी. या निमित्त , उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, , संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.

Live अपडेट्स…

>> करोनानंतर होम आयसोलेशनमध्ये असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ‘सदैव अटल’ येथे जाऊ शकले नाहीत. (
कृपया, संपूर्ण अपडेट्स वाचण्यासाठी पेज रिफ्रेश करा)

>> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत वाहिली माजी पंतप्रधान वाजपेयी यांना श्रद्धांजली.

>> पहा व्हिडिओ: माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली.

>> राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांचे समाधी स्थळ ‘सदैव अटल’ येथे उपस्थित.

>> अटलबिहारी वाजपेयी यांच्या कन्या नमिता कौल भट्टाचार्य आणि नात निहारिका यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना वाहिली श्रद्धांजली.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांच्या समाधीला प्रदक्षिणा घातली. आज अटलबिहारी वाजपेयी यांची दुसरी पुण्यतिथी आहे.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली

>> राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

>> राष्ट्रपती रामनाथ कोविंद समाधीस्थळी पोहोचले तेव्हाचे दृश्य… सोबत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू.

>> भारतीय जनता पक्षाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले.

>> या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

>> अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या समाधीस्थळी पोहोचले.

>> माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here