पुणे: अभिनेते सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पार्थ पवार यांनी केलेल्या मागणीचा वाद अजून संपलेला नसतानाच राष्ट्रवादीचे आमदार यांनी नवी मागणी पुढे रेटली आहे. राज्यातील मंदिरं आणि धार्मिस्थळं सुरू करा, अशी मागणी रोहीत पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विटरवरून ही मागणी केली आहे. मंदिरं आणि धार्मिकस्थळं लोकांसाठी सुरू व्हावीत असं माझंही म्हणणं आहे. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असं रोहित यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे पर्युषण पर्व काळात मंदिरं खुली करण्याची याचिका जैन समुदायाकडून कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रं सादर करून मंदिरं खुली करता येणार नसल्याचं म्हटलेलं असतानाच रोहीत पवार यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोहित यांच्या या मागणीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्यात काल ३२२ करोना बाधितांचा मृत्यू झाला असून आज दिवसभरात १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्याचवेळी काल ६ हजार ८४४ रुग्ण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या सहा लाखांच्या जवळ पोहचली आहे. राज्यात सध्या १ लाख ५६ हजार ४०९ रुग्णांवर (अॅक्टिव्ह रुग्ण) प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत.

राज्यातील कालचा करोना साथीचा तपशील हाती आला असून करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत अचानक घट झाल्याने चिंता वाढली आहे. काल दिवसभरात ६ हजार ८४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत ४ लाख ८ हजार २८६ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यात करोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ६९.८२ टक्के इतके आहे. राज्यात सर्वाधिक ४१ हजार ८० अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात असून पुण्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख २७ हजार ५१८ इतकी झाली आहे. आतापर्यंत पुण्यात करोनाने ३ हजार १३० रुग्ण दगावले असून ८३ हजार ३०८ रुग्ण बरे झाले आहेत. ठाण्यात १९ हजार ५४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबईत सध्या १७ हजार ५८१ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण बाधितांचा विचार केल्यास राज्यात मुंबईत सर्वाधिक म्हणजेच १ लाख २७ हजार ७१६ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. तर
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता १ लाख १२ हजार ६३८ इतकी झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

62 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here